Wednesday, February 23, 2022

 27 फेब्रुवारी ला मराठी भाषा गौरव दिन 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- अवघ्या मराठी  भावविश्वावर ज्यांनी राज्य केले, असे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी  जन्मदिन त्यांच्या या जन्मदिनी  मराठी भाष गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत. 

हा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार व्हावा हा उद्देश आहे. या धोरणाची अमंलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात  विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा प्रतिज्ञा  घेतली जाईल.  यासाठी स्थानिक प्रशासनाव्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. 

सध्याच्या कोविड- 19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन साजरे करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. परंतु जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य आहेत, तिथे  राज्य शासन यांनी आखून दिलेल्या कोविड मार्गदर्शन तत्वांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे  कळविण्यात आले आहेत.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...