Tuesday, February 22, 2022

 दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी केले आहे. 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. वरिष्ठ अधिक्षक तथा प्रभारी सहा. सचिव सी. के. जाधव यांचा भ्रमणध्वनी 9834165007, वरिष्ठ अधिक्षक ए. पी. चवरे 9421765683, वरिष्ठ लिपिक एस. एल. राठोड 8830298158 तर कनिष्ठ लिपिक आर. ए. बिराजदार 9892778841 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, पी. जी. सोळंके 9860286857, बी. एच. पाटील 9767722071 यांचा हा भ्रमणध्वनी नंबर लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

000000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...