Monday, January 31, 2022

                                  राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

·       प्रवेशिका 15 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी2021 ते 31 डिसेंबर2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि.31 जानेवारी 2022 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि प्रवेशिका पाठविण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

                        उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनामाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

००००

 येत्या 7 फेब्रुवारीपासून पहिली ते चौथीची शाळा

सुरु करण्यास मान्यता

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग 24 जानेवारी पासून सुरू करण्याबाबत शासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीचा विचार करून महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येत्या 7 फेब्रुवारी पासून जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. ही मान्यता देतांना दिनांक 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात यावेत, असे आदेशात डॉ. विपीन इटनकर यांनी बजावले आहे. वय वर्षे 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर शाळांनी भर दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दिनांक 31 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासही मान्यता दिली आहे.

0000000

 नांदेड जिल्ह्यात 215 व्यक्ती कोरोना बाधित

तर 334 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 203 अहवालापैकी 215 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 185 तर अँटिजेन तपासणीद्वारे 30 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 495 एवढी झाली असून यातील 96 हजार 415 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 409 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

रविवार 30 जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे खडकपुरा नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, वसमत येथील 70 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे उमरखेड येथील 77 वर्षाचा पुरुष तर खाजगी रुग्णालय हाऊसींग सोसायटी नांदेड येथील 82 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 671 एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 83नांदेड ग्रामीण 10, बिलोली 1, भोकर 1, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, हदगाव 3, कंधार 2, किनवट 56, लोहा 4, मुदखेड 3, मुखेड 1, नायगाव 2, उमरी 4, परभणी 9, हिंगोली 2, निजामाबाद 1, वाशीम 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 27कंधार 3 असे एकुण 215 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 85, खाजगी रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 242 असे एकुण 334 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 36, किनवट कोविड रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 281,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 56, खाजगी रुग्णालय 32 असे एकुण 2 हजार 409 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 45 हजार 202

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 27 हजार 826

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 495

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 96 हजार 415

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 671

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.99 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-138

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 409

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

 मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या सलग शेतजमिनीवर, बांधावर तसेच पडीक शेतजमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्ष लागवडीचा कालावधी 1 जुन ते 30 नोव्हेंबरपर्यंत ठरवून देण्यात आला होता. सन 2021-22 मध्ये फळबाग लागवडीसाठी असलेले अनुकूल वातावरण विचारात घेता फळबाग लागवडीसाठी हा कालावधी 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

 

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रोपवाटीकेवर आंबा, चिकु, पेरू, सीताफळ, मोसंबी, का. लिंबु. इत्यादी फळपिकांचे एकुण 3 लाख 46 हजार 342 कलमे-रोपे उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

Sunday, January 30, 2022

 नांदेड जिल्ह्यात 305 व्यक्ती कोरोना बाधित

तर 403 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 613 अहवालापैकी 305 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 250 तर अँटिजेन तपासणीद्वारे 55 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 280 एवढी झाली असून यातील 96 हजार 81 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 532 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

शनिवार 29 जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे खडकपुरा नांदेड येथील 28 वर्षाच्या एका महिलेचा व मुखेड तालुक्यातील शेवडीतांडा येथील 30 दिवसाच्या बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 667 एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 123, देगलूर 11, किनवट 12, नायगाव 7, उमरखेड 2, पंजाब 1, औरंगाबाद 3, नांदेड ग्रामीण 18, हिमायतनगर 1, लोहा 5, उमरी 18, नागपूर 1, अकोला 1, अर्धापूर 1, हदगाव 2, माहूर 1, बिलोली 4, हिंगोली 7, मुंबई 1, भोकर 2, कंधार 16, मुदखेड 10, चंद्रपूर 1, वाशीम 1, आंध्रप्रदेश 1  तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 24, लोहा 5, अर्धापूर 4, माहूर 1, बिलोली 5, मुखेड 11, हिमायतनगर 1, नायगाव 4 असे एकुण 305 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 282, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 107, खाजगी रुग्णालय 9 असे एकुण 403 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 29, किनवट कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 293,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 173, खाजगी रुग्णालय 35 असे एकुण 2 हजार 532  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 43 हजार 499

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 26 हजार 977

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 280

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 96 हजार 81

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 667

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-73

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 532

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4. 

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

Saturday, January 29, 2022

 नांदेड जिल्ह्यात 381 व्यक्ती कोरोना बाधित

तर 984 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 123 अहवालापैकी 381 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 335 तर अँटिजेन तपासणीद्वारे 46 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 235 एवढी झाली असून यातील 95 हजार 678 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 892 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 665 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 207, धर्माबाद 4, लोहा 8, बिलोली 4, वाशीम 1, हिंगोली 5, नाशीक 1, नांदेड ग्रामीण 32, कंधार 4, मुदखेड 2, उमरी 2, परभणी 7, अमरावती 1, राजस्थान 1, भोकर 4, हदगाव 1, मुखेड 15, नायगाव 14, अकोला 1, तेलंगणा 2, औरंगाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, धर्माबाद 1, मुखेड 5, नांदेड ग्रामीण 7, किनवट 2, हदगाव 1, बिलोली 6, अर्धापूर 3, देगलूर 2, मुदखेड 1 एकुण 381 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 778, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 187, खाजगी रुग्णालय 10, जिल्‍हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4 असे एकुण 984 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 34, किनवट कोविड रुग्णालय 1नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 293,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 532, खाजगी रुग्णालय 32असे एकुण 2 हजार 892  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 42 हजार 386

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 25 हजार 746

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 235

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 95 हजार 678

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 665

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.51 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-86

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 892

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4. 

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

Friday, January 28, 2022

 *किनवट उपजिल्हा रुग्णालयातील 'सिटी स्कॅन'साठी ३.१० कोटी उपलब्ध*

▪️पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने रुग्णांना दिलासा
 
नांदेड (जिमाका) दि. 28 :- पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्याकरिता ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत ही तरतूद करण्यात आली असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश निर्गमीत केले आहेत.
 
नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर हे तालुके आदिवासी बहुल आहेत. किनवटपासून नांदेडचे अंतर सुमारे १५० किलोमीटर असल्याने आपत्कालीन प्रसंगी या तालुक्यांमधील रुग्णांना योग्य निदान व उपचाराच्या सुविधेसाठी नांदेड किंवा आदिलाबादला धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. या परिसरातील रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी किनवट येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सेवा-सुविधा भक्कम करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. यानुसार किनवट येथे उपलब्ध असलेल्या ट्रामा केअरच्या कुशल मनुष्यबळाला आता सिटी स्कॅनची जोड मिळणार असून, गंभीर दुखापत झालेल्या तसेच आजारी रुग्णांच्या तात्काळ अचूक निदानासाठी हे सिटी स्कॅन मशीन महत्वाचे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे.
 
किनवट तालुक्यात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आधुनिक यंत्रसामुग्रीने करता याव्यात, यादृष्टीने किनवट उपजिल्हा रुग्णालयात फेको मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे गरजूंना विनाटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया करता येणे शक्य झाले आहे. या मशीनचा लाभ शेजारच्या तालुक्यातील नागरिकांनाही होत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिरसीकर यांनी दिली. या उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला तीनशे ते चारशे रुग्ण प्रथमोपचारासाठी येतात. महिन्याला 70 ते 80 महिलांचे बाळंतपण या ठिकाणी केले जाते. या रूग्णालयात ५० खाटांची मान्यता आहे.  
000000

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी

वारसांना कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना घेता यावा यासाठी शासनाने सोमवार 31 जानेवारी 2022 पर्यत आवश्यक ती कागदपत्रे व माहिती बँकांकडे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे बँकांकडे जमा करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.

 

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ही शासन निर्णय दि. 27 डिसेंबर, 2019 अन्वये कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारित / अद्यावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) सादर करण्यासाठी यापुर्वी 22 ऑक्टोंबर 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदत दिली होती. अद्याप ज्या मयत शेतकऱ्यांनी वारसाची नोंदीसाठी माहिती बँकेस सादर केली नाही अशा मयत शेतकऱ्यांच्या वारसांना वारसाची नोंद घेण्यासाठी सोमवार 31 जानेवारी 2022 पर्यत अंतीम मुदत दिली आहेअसेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

000000

 नांदेड जिल्ह्यात 353 व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 हजार 22 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 834 अहवालापैकी 353 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 276 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 854 एवढी झाली असून यातील 94 हजार 694 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 495 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 665 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 129, धर्माबाद 19, लोहा 7, बिलोली 1, लातूर 1, आदिलाबाद 2, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 26, कंधार 12, मुदखेड 7, माहूर 23, परभणी 7, हैद्राबाद 1, उत्तरप्रदेश 1, भोकर 4, हदगाव 2, मुखेड 4, नायगाव 2, हिंगोली 5, तेलंगणा 4, पंजाबा 1, देगलूर 1, किनवट 7, हिमायतनगर 5, अमरावती 1, बीड 1, दिल्ली 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 15, भोकर 9, बिलोली 6, देगलूर 9, धर्माबाद 13, किनवट 1, माहूर 3, मुदखेड 4, मुखेड 4, नायगाव 4, उमरी 9 असे एकुण 353 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 784, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 228, खाजगी रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 1 असे एकुण 1 हजार 22 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 32, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 175, किनवट कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 245, खाजगी रुग्णालय 38 असे एकुण 3 हजार 495  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 40 हजार 262

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 24 हजार 101

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 854

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 93 हजार 694

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 665

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-176

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 495

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...