नांदेड जिल्ह्यात 305 व्यक्ती कोरोना बाधित
तर 403 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 613 अहवालापैकी 305 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 250 तर अँटिजेन तपासणीद्वारे 55 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 280 एवढी झाली असून यातील 96 हजार 81 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 532 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
शनिवार 29 जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे खडकपुरा नांदेड येथील 28 वर्षाच्या एका महिलेचा व मुखेड तालुक्यातील शेवडीतांडा येथील 30 दिवसाच्या बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 667 एवढी आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 123, देगलूर 11, किनवट 12, नायगाव 7, उमरखेड 2, पंजाब 1, औरंगाबाद 3, नांदेड ग्रामीण 18, हिमायतनगर 1, लोहा 5, उमरी 18, नागपूर 1, अकोला 1, अर्धापूर 1, हदगाव 2, माहूर 1, बिलोली 4, हिंगोली 7, मुंबई 1, भोकर 2, कंधार 16, मुदखेड 10, चंद्रपूर 1, वाशीम 1, आंध्रप्रदेश 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 24, लोहा 5, अर्धापूर 4, माहूर 1, बिलोली 5, मुखेड 11, हिमायतनगर 1, नायगाव 4 असे एकुण 305 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 282, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 107, खाजगी रुग्णालय 9 असे एकुण 403 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 29, किनवट कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 293, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 173, खाजगी रुग्णालय 35 असे एकुण 2 हजार 532 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 43 हजार 499
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 26 हजार 977
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 280
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 96 हजार 81
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 667
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-73
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 532
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4.
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment