Monday, January 31, 2022

 येत्या 7 फेब्रुवारीपासून पहिली ते चौथीची शाळा

सुरु करण्यास मान्यता

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग 24 जानेवारी पासून सुरू करण्याबाबत शासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीचा विचार करून महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येत्या 7 फेब्रुवारी पासून जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. ही मान्यता देतांना दिनांक 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात यावेत, असे आदेशात डॉ. विपीन इटनकर यांनी बजावले आहे. वय वर्षे 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर शाळांनी भर दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दिनांक 31 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासही मान्यता दिली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...