“अल्पसंख्याक हक्क दिवस” ऑनलाईन वेबिनार द्वारे संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 18
:-कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर “अल्पसंख्यांक हक्क दिवस” हा
कार्यक्रम ऑनलाईन वेबीनारद्वारे घ्यावा लागत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी या अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख वक्ते ॲड. सरदार अमनपालसिंघ स्वर्णसिंघ कामठेकर
व ॲड एम. एस. युसूफजई यांनी अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर
हक्कांबाबत जाणीव करून मार्गदर्शन केले.
नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने 18 डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबीनाद्वारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य), जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, इतर अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती ऑनलाईन वेबीनाद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी अल्पसंख्याक समुदयांनी विचारलेल्या विविध प्रश्नांबाबत शासनाच्या निकषानुसार समर्पक उत्तरे देऊन आभार मानले.
000000
No comments:
Post a Comment