Sunday, December 19, 2021

 नायगाव नगरपंचायत सर्वसाधारण प्रवर्गातील

महिला आरक्षणाची गुरुवारी फेर सोडत

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  नायगाव नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या ना. मा. प्र व ना. मा. प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांची सोडत काढण्याचा कार्यक्रम नायगाव (खै) येथील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तालुका उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 23 डिसेंबर 2021 रोजी नायगाव नगरपंचायत कार्यालयात सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. 

नायगाव नगरपंचायत क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीच्या ना.मा.प्र. साठी आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठेवावयाच्या जागंसाठी सुधारीत फेर सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे, असेही जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...