Friday, December 31, 2021

 बारावी परीक्षेचे साहित्य शुक्रवारी स्विकारले जाणार   

नांदेड (जिमाका) दि. 31 :- मार्च 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज 12 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत नियमित शुल्काने ऑनलाईन पद्धतीने भरले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे प्रि-लिस्ट, विद्यार्थ्यांच्या एक्सल सीटमधील याद्या, चलन, आरटीजीएस केलेल्या चलनाची प्रत, परिशिष्ट ब आदी साहित्य शुक्रवार 7 जानेवारी 2022 रोजी पिपल्स हायस्कूल नांदेड येथे सकाळी 11 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते 5 या वेळेत मंडळाच्या प्रतिनिधी मार्फत स्विकारण्यात येणार आहेत. 

लातूर विभागीय मंडळांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी. महाविद्यालयाच्या प्रतिनिधीला हे साहित्य देऊन संकलन केंद्रावर जमा करण्याबाबत कळवावे, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

00000

 

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 850 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 550 एवढी झाली असून यातील 87 हजार 879 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 16 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3 व नायगाव तालुक्यातंर्गत 1 असे एकुण 4 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 1 व खाजगी रुग्णालयातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  आज 16 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 13, खाजगी रुग्णालय 1 अशा एकुण 16 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 96 हजार 867

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 92 हजार 760

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 550

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 879

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 दहावी, बारावी परीक्षेसाठी

अर्ज भरण्याचे विलंब शुल्क माफ

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- सन 2022 च्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशापर्यंत नियमित शुल्काने ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या विलंब शुल्काने अर्ज भरण्याबाबत तारखा जाहीर केल्या होत्या. परंतू आता विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे. ही सुविधा मार्च-एप्रिल 2022 या वर्षासाठी मर्यादीत आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 तर बारावीची परीक्षा ही 4 मार्च 2022 पासून सुरु होत आहे. नियमित शुल्काने परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शाळा, महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

000000

 ओमिक्रॉनच्‍या पार्श्‍वभूमीवर 

नांदेड जिल्‍ह्यासाठी निर्बंध लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- ओमिक्रॉन, कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याचा वाढलेला धोका आणि कोविड-19 चा प्रसार रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यासाठी पुढील काही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.   

 

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानी पुढील काही निर्देश निर्गमीत केले आहेत. हे निर्देश 31 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून लागू होतील. या आदेशानुसार नांदेड जिल्‍ह्यात पुढील निर्बंध जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केले आहेत. 

 

विवाह समारंभाच्या बाबतीत समारंभ बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेवर असो त्‍याठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती पुरती मर्यादित असेल. बंदिस्त जागेत किंवा मोकळ्या जागेवर, कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम, मग तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, त्‍याठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. 

 

अंत्‍यसंस्कारांच्या बाबतीत जास्तीतजास्त उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असेल. राज्य / जिल्‍ह्याच्‍या कोणत्याही गर्दीच्‍या ठिकाणी, पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने इत्‍यादी ठिकाणी, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार नांदेड जिल्‍ह्यातील गर्दीच्‍या ठिकाणी आवश्‍यकतेनुसार तसे यथावकाश आदेश निर्गमित करण्‍यात येतील. तसेच याअधी अस्तित्‍वात असलेल्‍या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. 

 

या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील व संदर्भ 1 व 2 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. निर्गमीत आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्‍ह्यातील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुखांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील.

00000

Thursday, December 30, 2021

 राज्य मार्ग परिवहन महामंडळात

शिकाऊ उमेदवारांसाठी भरती

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये सन 2021-22 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org व अभियांत्रिकी, पदवीधरपदवीकाधारक उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी नंबर जनरेट झाल्यानंतर एमएसआरटीसी विभाग नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज केल्यानंतर विभागाचे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन तो 14 जानेवारी रोजी वाजेपर्यंत विभागीय कार्यालयात सादर करावेतअसे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या नांदेड विभाग नियंत्रकांनी केले आहे.

 

शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात (यांत्रिक-36, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-अभियांत्रिक पदवीधर/पदवीकाधारक-अशी एकुण 56 जागा आहेत. या जागांपैकी अनुसूचीत जातीअनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत) या जागेसाठी विहीत नमुन्यातील छापील अर्ज आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड येथे 14 जानेवारी 2022 रोजी वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जाची किंमत जीएसटी 18 टक्केसह खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. ही शिकाऊ उमेदवार भरती नांदेड जिल्ह्यासाठी असून केवळ नांदेड जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा व्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज व मागील वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असेही राज्य परिवहन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Attachments area

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 3 जानेवारी 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.

 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.

 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 कृषि विभागाच्या विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनांसाठी कागदपत्रांची पुर्तता करून प्रशासन आपल्या दारी या उपक्रमात सहभाग घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कृषि विभागातील विविध योजनेचा आढावा व संनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

 

जिल्ह्यामध्ये स्मार्ट योजनेंतर्गत 13 शेतकरी उत्पादक कंपन्यांना आराखडे तयार करण्यासाठी प्राथमिक मान्यता मिळाली आहे. आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्हयामध्ये नुकसान भरपाई मंजूर 461 कोटी पैकी 330 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम सद्यस्थितीत जमा करण्यात आली असून उर्वरीत रक्कम अदा करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

 

अन्नसुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान 2021-22 अंतर्गत जिल्ह्यात एकूण गोदामाचे 3 व बीज प्रक्रिया संयंत्राची एकचे लक्षांक प्राप्त असून अर्जामधून सोडत काढण्यात आली. यात देगलूर तालुक्यातील खानापूर शेतकरी उत्पादक कंपनीकावलगाव येथील बळीवंशी ॲग्रो प्रोडयूसर कंपनी,  मुदखेड येथील कपिलधारा ॲग्रो प्रोडयूसर कंपनीची गोदामासाठी व बिजप्रक्रीया सयंत्रासाठी हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील भगवती देवी शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात आली. गोदाम बांधकामासाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान किंवा रक्कम 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते देय आहे. बिजप्रक्रीया सयंत्रासाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा रक्कम 10 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे.

 

जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत हरबळ प.क.दगडसांगवीक्षिरसमुद्र चिकनानागापूरवाळकेवाडी या गावांची निवड करण्यात आली. या गावांचा आराखडा रक्कम रुपये 81 लाख 63 हजार रुपयाचा आहे. यामध्ये प्रामुख्याने पशुधन आधारीत शेतीपद्धती व इतर घटकांचा समावेश आहे. या आराखडयास जिल्हास्तरीय समितीची मंजूरी आहे.

 

प्रधानमंत्री  कृषि सिंचाई योजनेंतर्गत ठिबक व तुषार घटकासाठी 80 टक्के अनुदान आहे. याबाबत जास्त अर्ज घेण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. ऊस पिकासाठी शेतकऱ्यांनी 100 टक्के ठिबक संचाचा वापर करावा. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेमध्ये नांदेड जिल्हयाचा समावेश आहे. हळद व इतर मसाले पदार्थ एक जिल्हा एक उत्पादन मंजूर आहे. यासाठी वैयक्तीक लाभार्थ्यांना बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प सादर करता येतील. यासाठी प्रकल्पाच्या 35 टक्के कमाल 10 लाख रुपये अनुदान देय आहे.

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये वैयक्तीक लाभाच्या व गटाच्या प्रस्तावांचा लाभ प्रकल्पातील समाविष्ट गावांमध्ये मोहीम स्वरूपात देण्यात यावा. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येणारे प्रशिक्षणसहलीअभ्यास दौरेप्रात्यक्षिके यांचे लक्षांक पुर्ण करण्यात यावे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हयामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येणार असून याचे सुक्ष्मनियोजन करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

यांत्रीकीकरण सन 2021-22 अंतर्गत कृषि यांत्रीकीकरण उप अभियान 248.04 लाखराज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण 323.65 लाखराष्ट्रीय कृषि विकास योजना 164.63 लाख मंजूर कार्यक्रम असून जिल्हयात 62 हजार 670 अर्ज या बाबींना प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन सोडत काढून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.  

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकरी व कुटुंबातील व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेमधून दोन लाख मदत वाटप होते. तसेच दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये मदत देय आहे. यामधील सर्व प्रस्ताव तालुकास्तरावरून घेवून विमा कंपनीकडे पाठवावेत असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

00000

 नागरिकांनी घराबाहेर न पडता

नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे

-         जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

       

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये "ओमिक्रॉन" हा नवीन विषाणू आढळून आला आहे. यामूळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने खबरदारी म्‍हणून एकत्र न येता यावर्षी 31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्‍वागत घराबाहेर न पडता अत्‍यंत साधेपणाने घरच्या घरीच कराअसे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून या आदेशाचे पालन करावे. कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. 31 डिसेंबर व नूतन वर्ष 2022 च्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादित उपस्थित राहण्यास परवानगी राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींग राखणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिक व 10 वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी करु नये. सार्वजनिक ठिकाणी त्रिसुत्रीचा वापर करावा. विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्‍स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्‍यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. मिरवणूका काढण्यात येऊ नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करु नये. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व 31 डिसेंबर व नूतन वर्ष 2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे लागेल अशा मार्गदर्शक सूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

00000

 नांदेड जिल्ह्यात 3 कोरोना बाधित झाले बरे


नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 697 अहवालापैकी निरंक अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 3 कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 544 एवढी झाली असून यातील 87 हजार 875 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 14 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

 

हिमायतनगर तालुक्यातील 22 डिसेंबर रोजी एका कोरोना बाधित रुग्णांचा स्वाब राष्ट्रीय विषाणू जन्य रोग संशोधन संस्था पुणे यांच्या अहवालानुसार ओमिक्रोन या कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूमुळे बाधित झाल्याचे आढळून आला आहे. या ओमिक्रोन बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 14 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8खाजगी रुग्णालय 4 अशा एकूण 14 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 96 हजार 17

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 91 हजार 920

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 544

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 875

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.5 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...