सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्देश
नांदेड, दि. 14 (जिमाका) :- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कोविड-19 मुळे ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे, अशा संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी दिले आहेत. यात नियोजन आराखड्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याबाबत स्पष्ट केले आहे.
त्याअनुषंगाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील
संस्थाची अर्हता दिनांकाप्रमाणे प्रारुप मतदार यादी तयार करुन प्राधिकरणाचे
आदेशानुसार निवडणूक निधीसह संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व तालुका सहकारी
निवडणूक अधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता पहिल्या
व दुसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्था व समिती सदस्य यांनी आपल्या संस्थेची प्रारूप मतदार यादी
विहित नमुन्यात तयार करुन निवडणूक निधीसह तात्काळ जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी
किंवा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयास सादर करावी. ज्या संस्था प्रारुप
मतदार यांदी निवडणूक निधीसह सादर करणार नाहीत अशा संस्थांवर प्रशासकीय कार्यवाही
करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची राहील, असेही जिल्हा सहकारी
निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.
0000
No comments:
Post a Comment