अनाधिकृत बायोडिझेल विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश
नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात अनाधिकृतरित्या बायोडिझेलची विक्री करताना कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास जिवनाश्यक वस्तु अधिनियम 1955 च्या तरदुदीन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
राज्यात बायोडिझेलच्या अवैध विक्रीस प्रतिबंध
बसावा यासाठी 11 मे 2021
रोजी राज्याचे बायोडिझेल उत्पादन साठवणुक पुरवठा व विक्री धोरण 2021
धोरण निश्चित करण्यात आले. या धोरणानुसार विनापरवानगी बायोडिझेलची
विक्री करणाऱ्या व्यक्ती व संस्थावर गुन्हा नोंदवून प्रस्तापित करावाई करण्यात आली
आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या
संदर्भात तक्रार संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय
यांच्याकडे लेखी तक्रार करावी तसेच तक्रारीमध्ये दोषी आढल्यास त्याच्याविरूध्द
वस्तु अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने करवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी दिले आहे.
00000
No comments:
Post a Comment