मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
“सारथी” मार्फत स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण
नांदेड (जिमाका) दि. 5 :- मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी “सारथी” मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा-अराजपत्रित संयुक्त (गट-ब) पदाच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. “सारथी”ने उपलब्ध करुन दिलेल्या या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे, असे आवाहन व्यवस्थापकिय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. या सर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 पर्यंत असून अधिक माहितीसाठी http://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (पीएसआय-एसटीआय- एएसओ) पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्यातील अनेक होतकरु विद्यार्थी राज्यसेवेत आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहतात परंतू अनेकवेळा आर्थिक पाठबळ व कोचिंग अभावी होतकरु व हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या रिंगणातून बाहेर पडतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकवेळा आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षित अधिकारी घडविण्यासाठी सारथीमार्फत एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (पीएसआय-एसटीओ-एएसओ) ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले आहे.
या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी “सारथी” मार्फत अर्ज मागविण्यात आले असून
यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांना ऑनलाईन
पद्धतीने तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या
प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीद्वारे करण्यात येईल, असेही
आवाहन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment