Tuesday, August 3, 2021

 

बारावीचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड (जिमाक), दि. 3 :-  राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडाळामार्फत सन 2021 मध्ये इयत्ता 12 वीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर 3 ऑगस्ट रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषनिहाय संपादित केलेले गुण https://hscresult.11thadmission.org.in, https://msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in., https://lokmat.news18.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांची प्रिंट घेता येणार आहेत. तसेच www.mahresult.nic.in https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध आहे. 

या निकालाच्या तपशीलात सन 2021 मध्ये आयोजित 12 वी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्याने शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार, इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण, इयत्ता 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषय निहाय गुण व 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मुल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच 12 वीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे बारावीसाठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालायांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. हे गुणदान विचारात घेऊन मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे. 

2 जुलै 2021 रोजी शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2021 मधील 12 वी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक, दोन संधी उपलब्ध राहितील, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...