Friday, July 30, 2021

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील के. एम. पटणे यांना निरोप सभारंभ   

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्हाधिकारी कार्यालयातील वनहक्क कायदा शाखेतील के. एम. पटणे यांना वयाचे 58 व्‍या वर्षी महसूल विभागात नियत वयोमानाने यापूर्वी सेवानिवृत्‍त झाल्‍यानंतर त्यांनी वनहक्‍क कायदा या शाखेत मानधनावर 12 वर्ष काम केले. त्यांना वयाचे 70 व्या वर्षानंतर आज पुन्हा निरोप सभारंभ देण्‍यात आला. त्यांचा हा निरोप समारंभ उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य प्रशासन) शरद मंडलीक यांचे हस्‍ते करण्‍यात आला.

यावेळी तहसिलदार श्रीमती उज्वला पांगरकर, नायब तहसिलदार श्रीमती संजिवणी मुपडे, सुनिल माचेवाड, सामान्‍य प्रशासन विभागाचे कर्मचारी  बालाजी  बंगरवार, सतिश कदम, माधव पवार, रामदास ढगे, अनिल ढापसे, महेंद्र चातगिळे, श्रीमती अनिता काळे, दिपीका डहाळे, कऱ्हाड, सूर्यवंशी, श्री. चुनुकवाड, दिपीका डहाळे, कऱ्हाळे, रमेश कॅदरवाड आदी कर्मचारी उपस्थित होते. 

कर्तव्‍य तत्‍पर राहून कार्यालयीन कामकाज कशाप्रकारे पार पाडावे याचे एक उदाहरण म्‍हणजे श्री. पटणे आहेत. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत  50 वर्ष  सेवा केली असून खेळाचा छंदही त्यांनी जोपासला आहे. कर्मचाऱ्यांनी कर्तव्य तत्पर राहून कार्य करावे, असे मनोगत उपजिल्‍हाधिकारी शदर मंडलिक यांनी यावेळी व्यक्त केले. नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांनी श्री. पटणे यांच्या कार्याची प्रशंसा केली. महसूल सहायक माधव पवार यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...