लोहा तालुक्यात गोदावरी नदीपात्र परिसरात 144 कलम लागू
नांदेड (जिमाका) दि. 6 :- लोहा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळुचा उपसा होऊ नये यासाठी तालुक्यातील भारसवाडा, अंतेश्वर, पेनूर, बेटसांगवी, शेवडी बा. येळी, कामळज, कौडगाव, चिंचोली, डोंगरगाव, आडगाव, बोरगाव, भेंडेगाव, जवळा, पळशी, शेलगाव धा. या गावातील गोदावरी नदीपात्रापासून वाहनाना प्रवेश करण्यास शनिवार 24 जुलै 2021 रोजीच्या 24 वाजेपर्यंत प्रतिबंध केले आहे. लोहा तहसिलदार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार हा आदेश निर्गमीत केला आहे.
कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध
भारतीय दंड विधान संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शासकीय
कर्तव्यावरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकिय
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वाहन तसेच क्षेत्रात वाहनास प्रवेश करण्यासाठी सक्षम
अधिकाऱ्यांने परवानगी दिलेल्या वाहनास हा आदेश लागू होणार नाही. लोहा तहसिलदार
यांनी 25 जून रोजी हा आदेश निर्गमीत केला आहे.
00000
No comments:
Post a Comment