Saturday, July 31, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 873 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 179 एवढी झाली असून यातील 87 हजार 477 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 47 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे मुखेड तालुक्यात 1, मुदखेड 1, माहूर 1 असे एकूण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 4 व्यक्तीला सुट्टी देण्यात आली. 

आज 47 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 40 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 59 हजार 651

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 57 हजार 510

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 179

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 477

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-36

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-47

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

जिल्ह्यातील 80 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 80 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 1 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या एकुण 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालयात कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 16 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बिलोली, हिमायतनगर, कंधार, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 10 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड, ग्रामीण रुग्णालय मांडवी या 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण भागातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 50 डोस कोविशील्डचे देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत एकुण 8 लाख 19 हजार 568 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 54 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 95 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 49 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रथम वर्षाच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ  

नांदेड, दि. 31 (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष 2021- 22 साठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश नोंदणीस शुक्रवार 6 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतर 3 वर्ष कालावधीची पूर्णवेळ पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रथम प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चित करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ई-स्क्रुटीनी, प्रत्यक्ष स्क्रुटीनी, छाननी पद्धतीची माहिती, प्रवेश पात्रतेचे निकष, अर्ज भरण्यासाठी लागणारे शुल्क, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आदी बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल लागण्यापूर्वी पदविका प्रवेश प्रक्रिया नोंदणीस सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतन प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणे आहे. नुकतीच झालेली राज्यातील पूर परिस्थिती, विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रास लागणारा विलंब या बाबी लक्षात घेऊन विद्यार्थी प्रवेश अर्ज 6 ऑगस्ट पर्यंत भरु शकतील. त्रुटीच्या पुर्तता ही  10 ते 12  ऑगस्ट 2021 दरम्यान करता येईल. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रवेश मदत केंद्र शनिवारी व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चालू असल्याने जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले.

000000

पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे 

नांदेड, दि. 31 (जिमाका) :- शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पाणंद रस्त्याचे माती काम व त्याचे मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. कंधार तालुक्यातील कारतळा या गावातील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, जिल्हाध्यक्ष भोसीकर, मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, कारतळाचे सरपंच संभाजी कदम पाटील, गटविकास अधिकारी श्री. बळवंत, ग्रामसेवक सुरवसे, कारतळा येथील शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावात पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळण-वळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत होईल. याच धर्तीवर कारतळा येथील मारोती मंदिरापासून ते पुढे एक कि.मी अंतराच्या पाणंद रस्त्याचे माती कामाची सुरुवात करण्यात येत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकास कामात कोणतीही अडचण येणार नाही, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी स्पष्ट केले.  

जिल्ह्यातील रस्ते विकासासोबतच पाणी पुरवठ्याच्या योजनेतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन या योजनेची अंमलबजावणी पहिल्या फेजमध्ये घेऊन ती पूर्ण करावी. योग्य नियोजन व आराखडा तयार करुन शासनाच्या योजना गावा-गावात राबविण्यात याव्यात. त्यासाठी शासन सर्वोतोपरीने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात वृक्षारोपण करुन मोठ्या प्रमाणात गावे हरित करण्याचा संकल्प करावा. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा आर्दश येणाऱ्या पिढीसमोर ठेवावा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

0000







Friday, July 30, 2021

 नांदेड जिल्ह्यात व्यक्ती कोरोना बाधित तर कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या हजार 153 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 174 एवढी झाली असून यातील 87 हजार 473 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 46 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1किनवट 1 असे एकूण 2 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, उमरी तालुक्यातर्गंत 2, कंधार तालुक्यातर्गंत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 46 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3किनवट कोविड रुग्णालय 1देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 56 हजार 778

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 54 हजार 655

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 174

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 473

एकुण मृत्यू संख्या-हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-39

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-46

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील के. एम. पटणे यांना निरोप सभारंभ   

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्हाधिकारी कार्यालयातील वनहक्क कायदा शाखेतील के. एम. पटणे यांना वयाचे 58 व्‍या वर्षी महसूल विभागात नियत वयोमानाने यापूर्वी सेवानिवृत्‍त झाल्‍यानंतर त्यांनी वनहक्‍क कायदा या शाखेत मानधनावर 12 वर्ष काम केले. त्यांना वयाचे 70 व्या वर्षानंतर आज पुन्हा निरोप सभारंभ देण्‍यात आला. त्यांचा हा निरोप समारंभ उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य प्रशासन) शरद मंडलीक यांचे हस्‍ते करण्‍यात आला.

यावेळी तहसिलदार श्रीमती उज्वला पांगरकर, नायब तहसिलदार श्रीमती संजिवणी मुपडे, सुनिल माचेवाड, सामान्‍य प्रशासन विभागाचे कर्मचारी  बालाजी  बंगरवार, सतिश कदम, माधव पवार, रामदास ढगे, अनिल ढापसे, महेंद्र चातगिळे, श्रीमती अनिता काळे, दिपीका डहाळे, कऱ्हाड, सूर्यवंशी, श्री. चुनुकवाड, दिपीका डहाळे, कऱ्हाळे, रमेश कॅदरवाड आदी कर्मचारी उपस्थित होते. 

कर्तव्‍य तत्‍पर राहून कार्यालयीन कामकाज कशाप्रकारे पार पाडावे याचे एक उदाहरण म्‍हणजे श्री. पटणे आहेत. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत  50 वर्ष  सेवा केली असून खेळाचा छंदही त्यांनी जोपासला आहे. कर्मचाऱ्यांनी कर्तव्य तत्पर राहून कार्य करावे, असे मनोगत उपजिल्‍हाधिकारी शदर मंडलिक यांनी यावेळी व्यक्त केले. नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांनी श्री. पटणे यांच्या कार्याची प्रशंसा केली. महसूल सहायक माधव पवार यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.

0000

 

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 30 (जिमाका) :- राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोड हे शनिवार 31 जुलै रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शनिवार 31 जुलै 2021 रोजी लातूर येथून मोटारीने सकाळी 10.15 वा. कंधार तालुक्यातील कारतळा येथे पाणंद रस्त्याचे उद्घाटनास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. श्री. एम. जी. मोमीन यांच्या सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- श्री शिवाजी विद्यालय कुरुळा ता. कंधार. सकाळी 11.15 वा. प्रा. डी. एम. किडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- कुरुळा ता. कंधार. सकाळी 11.20 वा. मौ. कुरुळा ता. कंधार येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. अनु. जाती, जमाती, विजा-भजा, इमाव, विमाप्र शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनेने आयोजित केलेली राज्यस्तरीय पहिली आरक्षण परिषद व डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- नागोरावजी नरवाडे मंगल कार्यालय तरोडा नाका नांदेड. दुपारी 3.30 वा. विठ्ठल दगडोजीराव चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट स्थळ- यशोसाई हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला, एल-2 सगुन सिटी नांदेड. दुपारी 4 वा. नांदेड येथून उदगीरकडे प्रयाण करतील.

000000

 

जिल्ह्यातील 87 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 87 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 31 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर एकूण 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 11 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय मांडवी, लोहा, उमरी या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण भागात 44 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 9 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 50 डोस कोविशील्डचे देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत एकुण 8 लाख 11 हजार 639 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 54 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 95 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 49 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि संदेश 

नांदेड (जिमाका), दि. 30 :- राज्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला असून यावर्षी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी व मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. अळी देठ, फांदी व खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते व पुर्ण झाड वाळून जाते. वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. 

चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा 15 दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या 30-35 दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50 टक्के, 30 मिली प्रति 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस. सी. 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस. सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड. सी 2.5 ग्रॅ. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000


 

विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांची सामाजिक न्याय भवनास भेट 

नांदेड, दि. 30 (जिमाका) :- विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले व भारत सरकारच्या विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी भवनातील सर्व कार्यालये व परिसरातील स्वच्छतेसह इतर बाबी उत्कृष्ट असल्याबाबत समाधान व्यक्त केले. 

सामाजिक न्याय भवनाचा परिसर, अभिलेख अभिरक्षा कक्ष, समाज कल्याण विविध योजनांच्या ऑनलाईन प्रणालीची माहिती घेतली. कार्यालयातील झिरोपेंडन्सीसह जिल्हयातील सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या ईमारतीशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे नेहमी संपर्कात असल्याचे त्यांनी कौतुक केले. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला प्राप्त झालेला कॉर्पोरेट ऑफीसचा लूक, वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आणि परिसरातील डवरलेल्या फुलबागा आणि झालेले वृक्षारोपणाचे काम याबददल प्रशंसा करुन शासकीय कार्यालयात अशा बाबी होणे ही एक दुर्मीळ घटना आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. 

सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर हे एक उपक्रमशील अधिकारी असून ते अत्यंत चांगले कार्य करीत आहेत असे उदगार त्यांनी यावेळी काढले. यावेळी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी हे श्रेय माझ्या एकटयाचे नसून माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आहे. आम्हास सतत प्रेरणा देणारे समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड यांचे अमुल्य मार्गदर्शनाने हे होऊ शकले असेही यावेळी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर म्हणाले. देवीदास राठोड, माणिक जोशी, राजीव एडके, कवी बापू दासरी, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक व राजेश सुरकूटलावार आणि सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी आणि काही समाज सेवकही उपस्थित होते.




00000

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गंत रब्बी हंगामातील अनुदानासाठी

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 30 (जिमाका) :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्न धान्य, गळीत धान्य, नगदी पिके सन 2021-22 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचनसाधने या बाबींचे अनुदान प्राप्तीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांसाठी कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. 

सन 2014-15 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018-19 पासून या अभियानात पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य 60-40 टक्के याप्रमाणे आहे. योजनेचा उद्देश क्षेत्रविस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे. आहे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात अन्नधान्य, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात गळीतधान्य, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील नगदी पिके कापूस, ऊस. या अभियानात राबविण्यात येणाऱ्या बाबीत पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिके (आंतरपिक) इत्यादी. मुलभूत बियाणे खरेदी (गळीतधान्य), प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य, एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधन, पीक पध्दतीवर आधारीत प्रशिक्षण. वैशिष्ट्यपूर्ण बाबी शेतकऱ्यांचे शेतमालाचे मुल्यवर्धनासाठी मिनी राईस मिल, मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी), बीज प्रक्रिया संच (एफपीओसाठी), भात शेतीमध्ये मत्स्यपालन, तेलघाणी इत्यादी घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी केली जाते. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात सन 2021-22 साठी अन्नधान्य पिकांसाठी 641.158 लाख रुपये तर गळीतधान्य व वृक्षजन्य तेलबिया पिकांसाठी 390.942 लाख रुपये आणि नगदी पिकांसाठी 39.95 लाखाचा कार्यक्रम मंजूर आहे, असे नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Thursday, July 29, 2021

 

तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत सांस्कृतिक भवनाला प्राधान्य

- अध्यक्ष भिकू रामजी इदाते 

विमुक्त जाती व भटक्या जमाती योजनांचा घेतला आढावा  

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती वर्गातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात असलेला दुर्गम भाग लक्षात घेता तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत समाज मंदिर भवनाला विशेष प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना भारत सरकारच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी दिल्या.

 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सामाजिक न्यायाच्या दृष्टिने केंद्र सरकारच्या योजना राज्यस्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नात आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजुंना घेता यावा यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करुन देणे हे संबंधित विभागाचे काम आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या वर्गातील लोकांच्या जात पडताळणी समितीकडे असलेल्या प्रकरणांचा नियमाप्रमाणे तात्काळ निपटारा करुन त्यांना न्याय देण्याच्या सूचना अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी केल्या.

 

या बैठकीत जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. कै. वसंतराव नाईक महामंडळ, घरकूल, तांडावस्ती सुधार योजना, समाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना यांची माहिती त्यांना देण्यात आली.  



00000

 

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र

बोधाचिन्ह (लोगो) स्पर्धेचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठाच्या बोधचिन्ह (लोगो) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नियम, अटी व पुरस्काराची माहिती क्रीडा व युवक संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेत भारतातील नागरीक भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याची मुदत मंगळवार 10 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 50 हजार, 30 हजार व 20 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.   

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिने प्रोत्साहन मिळावे याअनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जोचे क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे. याच उद्देशाने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र स्थापन केले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

*****

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...