नांदेडच्या जिल्हा पाणी गुणवत्ता
तपासणी प्रयोगशाळेस
राष्ट्रीय पातळीवरील एनएबीएलची मान्यता
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून
अभिनंदन
नांदेड, दि. 4 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेस
राष्ट्रीय पातळीवरील एनएबीएल (नॅशनल ॲक्रिडिटेशन
बोर्ड फॉर कॅलीब्रेशन ॲड टेस्टिंग लॅब्रोराटरी ) ची मान्यता मिळाली असून तसे अधिस्विकृती
प्रमाणपत्र कॉलिटी कॉन्सील ऑफ इंडिया बोर्ड यांच्याकडून प्रयोग शाळेस प्राप्त झाले
आहे. एनएबीएलचे ॲक्रिडिटेशन मिळणारी महाराष्ट्रातील ही दुसऱ्या क्रमांकाची तर
मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाची पाणी तपासणी प्रयोगशाळा म्हणून हा गौरव झाल्याने
नांदेडच्या शिरपेचात या यशाने मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल वरिष्ठ
भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील कार्यरत असलेल्या सर्व संशोधकाचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. भूजल
सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सर्वांचे अभिनंदन
केले.
नांदेड
जिल्ह्यात जिल्हा पातळीवरील एक प्रयोगशाळा तर तालुक्यांसाठी कंधार, मुखेड,
गोकुंदा, उमरी, हदगाव, देगलूर अशा 7 प्रयोगशाळा आहेत. या प्रयोग शाळांमार्फत
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व स्त्रोतांमधील पाण्याची
तपासणी करुन दिली जाते. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पाण्याची तपासणी
करायची आहे अशा शेतकऱ्यांकडून शासनाने ठरवून दिलेले शुल्क घेऊन त्याही पाण्याची
तपासणी करुन दिली जाते. ग्रामपंचायत, शहर, महानगर आणि शेतीसाठी अत्यंत अत्यावश्यक
असलेल्या या पाणी गुणवत्ता प्रयोग शाळेस मिळालेले एनएबीएलची मान्यता ही
गुणवत्तेच्यादृष्टिने आश्वासक ठरली आहे. ही मान्यता नांदेडच्या प्रयोगशाळेस मिळाली
असून आता यापुढे या प्रयोगशाळेची जबाबदारी आणि प्रमाणिकीकरण करण्यासाठी अधिकाधिक
मान्यताप्राप्त उपकरणाची आणि लागणाऱ्या सर्व साहित्यांची अत्यावश्यकता महत्वपूर्ण
राहिल.
या यशासाठी
वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
कार्यालयाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक आर. बी. पवार, एस. पी. राठोड, अमित झिरंगे,
गुणवत्ता व्यवस्थापक व्ही. एम. गड्डमवाड, तांत्रिक व्यवस्थापक एस. जे. शेख,
रासायनिक श्रीमती पोपलाईकर, अनुजैविक तज्ज्ञ अन्नदाते, भवानकर, वाघतकर यांनी विशेष
परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment