नारी शक्ती पुरस्कारासाठी
नामांकन सादर करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 28:- महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला, संस्थांना शासनामार्फत नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी इच्छूक महिलांनी व संस्थानी नारी शक्ती पुरस्कारासाठी www.narishaktipuraskar.wcd.gov.in व www.wcd.nic.in या संकेतस्थळावर शनिवार 30 जानेवारी 2021 पर्यंत नामाकंने सादर करावेत, असे आवाहन नांदेडचे जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
अर्जदार महिलेचे वय 1
जुलै 2020 रोजी 25 वर्षे असावे. अर्जदार संस्थेला महिला विकास कार्याचा 5 वर्षे
अनुभव असावा. नामाकंन सादर करताना महिला विकास क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याचे
व इतर आवश्यक कागदपत्रे नामांकन सोबत सादर करावे. नामांकने सादर करण्याचे अंतिम मुदत
30 जानेवारी 2021 आहे. नामाकंने www.narishaktipuraskar.wcd.gov.in. व www.wcd.nic.in या वेबसाईटवर फक्त ऑनलाईन
पध्दतीने भरावेत. अधिक माहितीसाठी www.wcd.nic.in या संकेतस्थळास भेट दयावी, असेही
जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment