जिल्ह्यातील 17 हजार 19 नोंदणी असलेल्या
हेल्थ वर्करना कोरोना लसीची उपलब्धता
-
जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर
जिल्ह्यात कोरोना लसीचे स्वागत
नांदेड (जिमाका) दि. 14 :-कोरोना प्रादुर्भावातून नवसंजीवन देणाऱ्या कोविड लसीची उपलब्धता नांदेड
जिल्ह्यासाठी झाली असून लसीकरणाच्या पहिल्या फेरीत सुमारे 17 हजार 19 हेल्थ
वर्करना आपण हा डोस येत्या 16 तारखेपासून देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी दिली. आज जिल्हा परिषदेच्या औषध भांडार येथे या लसी शितकरणाच्या
पेटीमध्ये अत्यंत सुरक्षितरित्या पोहचल्या. या लसी स्विकारण्यासाठी आर्वजून आयोजित
करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता बाल संगोपन
अधिकारी डॉ. विद्या झिने, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक व इतर
अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने कोरोनाच्या या
आव्हानात्मक काळात अंत्यंत शर्थीचे प्रयत्न करुन कोरोना बाधितावर उपचार केले.
समाजाचे स्वास्थ सुदृढ ठेवण्यात ज्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले
त्यांच्यापासून लसीकरणाची ही मोहिम टप्याटप्याने सर्व लोकापर्यंत उपलब्ध होईल असे
डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे 17 हजार लसी
उपलब्ध झाल्या असून एका लसीच्या मात्रेमध्ये जवळपास 10 डोस उपलब्ध होऊ शकतात. हे
लक्षात घेता लसीची कसलीही कमतरता जिल्ह्यासाठी कमी न पडता सहज उपलब्ध होईल यासाठी जिल्हा
शासकीय यंत्रणा सिद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
00000
No comments:
Post a Comment