Tuesday, January 26, 2021

 

राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार- 2021

कामेश्वर वाघमारे याचे 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून कौतूक 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या शालेय विद्यार्थ्याला महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचेकडून राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021 घोषित झाला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याचे कौतूक करुन प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव केला. 

वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षेपर्यतच्या वयोगटासाठी  शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य या क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी बजावणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांने कंधार तालुक्यातील घोडज येथे 22 फेब्रुवारी 2020 रोजी ऋषी महाराज मंदिरात आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले व ओम मठपती हे तीघे दर्शनासाठी आले होते. तत्पुर्वी हे तिघेही आंघोळीसाठी मानार नदीच्या धोबीघाटावर गेले होते.  परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडत होते. यावेळी कामेश्वरने आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्राणाची पर्वा न करता पाण्याच्या बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. या शौर्याची दखल घेवून महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून त्यास प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार 2021 घोषीत झालेला आहे. मात्र यापैकी ओम मठपती या विद्यार्थ्यांचे प्राण वाचविता आले नसल्याचे शल्यही कामेश्वरला बोचत आहे असे कामेश्वर यांनी सांगितले.

00000




 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...