Friday, December 25, 2020

 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन दिन संपन्न  

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व सेवा हमी कायदा याविषयावर प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारद्वारे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी प्रस्ताविक उपजिल्हाधिकारी शरद मंडलीक यांनी केले. तर उच्च शिक्षण विभागाचे लेखाधिकारी निळकंठ पांचगे, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यालयाचे उपअभियंता भिमराव हाटकर यांनी ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिली गेली. शेवटी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांनी आभार मानले. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये क्षमतावृद्धी करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 26 (1) अन्वये माहितीचा अधिकार या विषयावर पदनिर्देशित केलेले सहाय्यक जन माहिती अधिकारी, राज्य जन माहिती अधिकारी, अपिलीय प्राधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे संनियंत्रण जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले होते.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...