Friday, December 25, 2020

 

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

स्पर्धकांनी व्हॉटसॲप, ईमेलद्वारे अर्ज करावा

जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तर युवा महोत्सव 2020-21 या वर्षाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने रविवार 27 डिसेंबर 2020 रोजी गुगलमिट (Google meet) या ॲपवर सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, युवक मंडळातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा ‍अधिकारी राजेश्वर मारावार (9975661081) व  क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु (9423140617) या क्रमांकावर व्हॉटसॲप तसेच  dsonanded.dsys-mh@gov.in या ई-मेलद्वारे सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करतांना त्यावर आपला व्हॉटसॲप क्रमांक असणे आवश्यक आहे. इच्छुक कलावंत / स्पर्धकांनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.  

आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग लातूर, जिल्हा क्रीडा परिषद नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतीक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शसनामार्फत सन 1994 या वर्षपासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करुन या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रतिनिधी युवा संघवरील राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होतो. राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. स्पर्धक विभागस्तरावर सहभागी होतात. त्यातून गुणवंत कलावंताची निवड होवून राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो.

जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धेच्या बाबी

सांघीक बाबीत लोकनृत्य स्पर्धेत 20 (साथीदारासह) कलाकार संख्या राहिल तर वेळेची मर्यादा 15 मिनिटे असेल. लोकगीत स्पर्धेत कलाकार 6 (साथसंग अतिरिक्त) तर 7 मिनिटे वेळ असेल. वैयक्तीक बाबीत  एकांकिका (One Act Play एक पात्री प्रयोग हिंदी/इंग्रजी ) स्पर्धेसाठी कलाकार संख्या 12 तर वेळेची मर्यादा 45 मिनिटे राहिल. याप्रमाणे शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी/कर्नाटकी), शास्त्रीय वादन- सितार, शास्त्रीय वादन- बासरी स्पर्धेसाठी कलाकार संख्या 1 तर वेळेची मर्यादा 15 मिनिटे राहिले. शास्त्रीय वादन तबला, शास्त्रीय वादन -  वीणा, शास्त्रीय वादन- मृदंग, हार्मोनियम वादन (लाईट),गिटार वादन,शास्त्रीय नृत्य मनिपुरी, शास्त्रीय नृत्य ओडिसी, शास्त्रीय नृत्य भरतनाटयम, शास्त्रीय नृत्य कथ्थक, शास्त्रीय नृत्य कुचिपुडी या स्पर्धेसाठी कलाकार संख्या 1 तर वेळेची मर्यादा 10 मिनिटे असेल. तर वक्तृत्व स्पर्धा ( ऐनवेळी देण्यात येणारा विषय) स्पर्धेसाठी कलाकार संख्या 1 तर वेळेची मर्यादा ही 4 मिनिटे राहिल.

स्पर्धेबाबत सूचना

स्पर्धक / कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे अशी राहील. वय हे 12 जानेवारी 2021 रोजी किमान 15 व जास्तीत-जास्त 29 वर्षे असावे. तर दिनाक 12 जानेवारी 1992 ते 12 जानेवारी  2006 या कालावधीत जन्म असावा. स्पर्धकाने नाव नोंदणी करताना प्रवेशीकेसोबत आपले आधारकार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळेचे ओळखपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही. स्पर्धकाचे वय 12 जानेवारी 2021 रोजी 15 ते 29 वर्षे असावे. स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी करतांना स्वत:चे प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी  राजेश्वर मारावार (9975661081),  क्रीडा  अधिकारी  गुरुदिपसिंघ संधु (9423140617) या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे सादर करावाक. तसेच  dsonanded.dsys-mh@gov.in  या मेलवर सुध्दा तो सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करतांना त्यावर आपला व्हॉटसॲप क्रमांक असणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही.  ज्या स्पर्धकांचे अर्ज दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत  वरील व्हॉटसॲप क्रमांकावर तसेच dsonanded.dsys-mh@gov.in या मेलवर येतील त्याच स्पर्धकांना कला सादर करण्याकरीता स्पर्धकांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर लिंक पाठविण्यात येईल. स्पर्धा 27 डिसेबर 2020 रोजी  सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत होईल. दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास ऑनलाईन सादरीकरणाची परवानगी देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेतच आपले सादरीकरण करावे. सादर केलेल्या बाबीची  व्हीडीओ  क्लीप तयार करुन  dsonanded.dsys-mh@gov.in या मेलवर परफॉरमन्स झाल्यावर लगेच पाठवावी. आपली कला सादर करतांना विद्युत पुरवठा खंडित होवून आपले सादरीकरणात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी स्पर्धकांनी स्वत: घ्यायची आहे. असे झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. त्यामुळे शक्यतो लॅपटॉप,  मोबाईलचा वापर करावा. परिक्षणाबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही. प्रतीस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याच वेळी आक्षेप ऑनलाईन सिध्द करणे आवश्यक राहील. कलाकारांना कला सादर करतांना कोणत्याही प्रकारची इजा, दुखापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. ऑनलाईन कला सादर करतांना सहभागी कलाकारांनी आपल्या वयाचा मूळ दाखला सोबत ठेवावा. एका कलाकारास एका बाबीत फक्त एकाच वेळेस सहभागी होता येईल. एकापेक्षा जास्त बाबीत सहभागी होता येईल. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होवू शकणार नाहीत. लातूर विभागाच्या विभागीयस्तर युवा महोत्सव संभाव्य तारीख 1 जानेवारी 2020  तर  राज्यस्तरीय युवा महोत्सवाची संभाव्य तारीख  30 ते 31 डिसेंबर 2020 मुंबई येथे राहिल. 

नांदेड जिल्हयातील  प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडाप्रेमी, युवांनी आपल्या शाळा, महाविद्यालयातील जास्तीतजास्त युवांना या स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता आपल्या शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशिका वर नमूद केलेल्या मुदतीत कार्यालयात वेळेत सादर करावे व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार (9975661081),  क्रीडा  अधिकारी गुरुदिपसिंघ संधु (9423140617) यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...