Thursday, December 31, 2020

 

 42 कोरोना बाधितांची भर तर  

37 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 31 :- गुरुवार 31 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 42 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 22 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 86 अहवालापैकी 1 हजार 37 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 467 एवढी झाली असून यातील 20 हजार 370 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 323 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 573 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 19, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, देगलूर कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 7, हैद्राबाद येथे संदर्भीत 1 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 20, देगलूर तालुक्यात 1, नायगाव 1, असे एकुण 22 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 8, माहूर तालुक्यात 7, हदगाव 2, नांदेड ग्रामीण 1, किनवट 1, नायगाव 1 असे एकुण 20 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 323 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 24, मुखेड कोविड रुग्णालय 16, देगलूर कोविड रुग्णालय 20, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 130, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 66, खाजगी रुग्णालय 33 आहेत.   

गुरुवार 31 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 175, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 60 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 81 हजार 662

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 55 हजार 912

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 467

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 370

एकुण मृत्यू संख्या-573

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-634

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-323

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.           

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...