राष्ट्रीय लोकअदालतीत कोवीड-19 अनुषंगाने
प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शक सूचना
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत कोवीड-19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी नागरिकांकरीता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
यात नागरीकांनी येतांना मास्क लावून येणे. सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. ज्या व्यक्तीची तडजोडी करीता आवश्यकता आहे. त्यांनीच न्यायालयात लोकन्यायालयाकरीता उपस्थित रहावे. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्याकरिता शासनाने नेमुन दिलेल्या नियमांचे व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीराम आर. जगताप व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.
न्यायालयात प्रलंबित असलेले दावे तडजोडीने आणि
सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी लोकअदालतीत व्हॉटसअप व्हिडिओ कॉलींग या
सुविधेच्या वापरास राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी परवानगी दिलेली आहे. कोरोना काळात ज्यांना न्यायालयात
येणे अशक्य असेल त्यांनी व्हॉटस अप सारख्या सोशल मिडियाचा वापर करुन तडजोड घडवून
आणता येईल. त्याकरीता पक्षकाराची ओळख पटवून न्यायालयात तडजोड होऊ शकते. या
सुविधेचा लाभ घेण्याकरीता पक्षकारानी आपल्या वकीलांना फोन करुन यासुविधेचा लाभ
पक्षकारांना घेता येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment