इयत्ता दहावी, बारावी परीक्षा शुल्क भरणा करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 28 :- लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक
शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी नोव्हेंबर-डिसेंबर,
2020 साठी आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर आपल्या माध्यमिक शाळा
व कनिष्ठ महाविद्यालयांचे परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार असून ते आपण
डाउनलोड करुन घ्यावयायचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पद्धतीने बॅक ऑफ इंडियामध्ये
भरणा न करता ते एचडीएफसी बँकेत भरणा करण्याबाबतची सुधारीत कार्यपद्धती
पुढीलप्रमाणे आहे.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी, आरटीजीएसद्वारे चलनावरील नमूद बँक अकाउंट नंबर व आयएफएससी कोड HDFC0000007 (एचडीएफसी सहा वेळा शुन्य सात) प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी
/ आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच अकाउंट
नंबर व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात
जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक /
प्राचार्य यांची राहील. तसेच माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क
मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रिया होणार नाही याची दक्षता सर्व
मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी घ्यावयाची आहे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment