Saturday, September 19, 2020

 

कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार :

जिल्हास्तरीय समितीची नाळेश्वरच्या शेतीला भेट 

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय समितीने नुकतीच कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील शेतकरी सौ. कमलबाई अन्नाराव धोतरे यांच्या शेतीला भेट दिली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिली आहे. 

यावेळी कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे प्रतिनिधी सिध्देश्वर मोकळे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, नांदेड पंचायत समितीचे सभापतीचे प्रतिनिधी बबनराव वाघमारे, माजी कृषि सभापती नरहरी वाघ, अतुल वाघ, कृषि अधिकारी पुंडलिक माने, कृषि पर्यवेक्षक करंजकर, कृषि सहाय्यक सौ. मोरताडे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शेखर कदम, कृषि अधिकारी चिंचोलकर, वि.अ. कृषि सतिश लकडे, श्रीमती प्रेरणा धांडे, वि.अ.सांखिकी श्री वाघ, कृषि सभापती यांचे स्विय्य सहाय्यक श्री. हाळे उपस्थित होते. 

समितीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन सौ. कमलबाई अन्नाराव धोतरे यांनी त्यांचे शेतावर फळबागेत मोसंबी, आंबा आदी फळांची लागवड केली आहे. त्यांनी शेततळे उभारुन त्यात मत्स्य उत्पादन घेतले आहे. यावेळी कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कामांविषयी समाधान व्यक्त करुन नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट दिली व जनावरांना वेळीच उपचार करण्यासाठी निर्देश दिले.  

*****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...