Wednesday, July 1, 2020


वृत्त क्र. 595   
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि दिन संपन्न
नांदेड (जिमाका) दि.  1 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिनानिमित्त आज बुधवार 1 जुलै, 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ. विपनी इटनकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मना आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.नाईक यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...