Wednesday, July 1, 2020


वृत्त क्र. 593   
शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी
कृषि विभागाने सदैव तत्पर रहावे
-          पालकमंत्री अशोक चव्हाण  
नांदेड (जिमाका) दि.  1 :- जिल्ह्यात आता पेरणी योग्य पाऊस झाला असून कृषि विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर योग्य ते मार्गदर्शन कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करुन शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करावे, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार अमर राजुरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे सभापती रामराव नाईक, सौ. सुशिलाताई बेटमोगरेकर, संजय बेळगे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे व कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार कृषि सप्ताहात जिल्हाभर केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी शेषराव चव्हाण, डॉ. बी. डी. चव्हाण, रोहिदास जाधव, विनोद चव्हाण, कैलास राठोड आदी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...