वृत्त क्र.
653
रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित
नांदेड, (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचे सुधारित भाडेदर जिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निश्चीत करण्यात आले आहेत.
त्याप्रमाणे दर आकारणी करावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे 9 जून 2020 रोजीचे आदेशान्वये रुग्णवाहिकांचे सुधारित
भाडेदराबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत परिवहन
आयुक्त कार्यालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार रुग्णवाहिकांचे दर निश्चित
करण्यात आले आहेत.
भाडेदर निश्चित करण्यात
आलेल्या रुग्णवाहिकेमध्ये मारुती व्हॅनसाठी 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 500 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 12 रुपये. टाटा सुमो व मॅटॅडोर
सदृश्य कंपनीचे बांधणी केलेली वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 550 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 14 रुपये. टाटा 407 स्वराज माझदा आदीच्या साठयावर बांधणी केलेली वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 650 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 14 रुपये. आय.सी.यू. अथवा
वातानुकूलित वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 1 हजार रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 24 रुपये याप्रमाणे राहतील असे
प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत
यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment