वृत्त क्र. 643
वाहनधारकांना 1 लाख 22 हजार 400 रुपयांचा दंड
नांदेड, दि. 13 :- कोरोना
विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात “मिशन ब्रेक द चेन”
अभियानात 390 वाहनांना प्रतिवेदने देण्यात आली असून वाहनधारकांकडून 1 लाख 22 हजार
400 रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर न फिरता
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे
तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले
आहे.
प्रादेशिक
परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांकडून 8 ते 12 जुलै या कालवधीत शहर व परिसरात
नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनाबाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रादेशिक
परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या आदेशावरुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश
राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत मर्यादेपेक्षा
जास्त व्यक्तीनी प्रवास करणे, मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे, मोटार वाहन
कायदयातील तरतुदीचा भंग करणाऱ्या दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी प्रवाशी वाहनांवर ही
कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मोटार वाहन निरिक्षक सर्वश्री. पायघन, शेख, सासे,
इंगळे व सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक सर्वश्री. पानकर, राजूरकर, गायकवाड, आव्हाड
यांनी सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment