शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके
अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करुन पावती
घ्यावी
नांदेड (जिमाका) दि. 3 :- शेतकऱ्यांनी अधिकृत
विक्रेत्यांकडून बियाणे, खते, किटकनाशके
खरेदी करुन न विसरता पावती घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी
अधिकारी माधुरी उदावंत व विश्वास अधापुरे कृषी अधिकारी पंचायत समिती धर्माबाद
यांनी केले आहे.
बनावट / भेसळ युक्त बियाणे, खते, किटकनाशके
खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा. खरेदी केलेल्या
बियाण्याचे वेस्टन किंवा पिशवी, टॅग खरेदीची पावती व त्यातील
थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी
बियाण्याचे पाकीट सीलबंद / मोहर बंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या
खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील
किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या
कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करा.
कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी तक्रारी सोडवण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषी
विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा,
असे आवाहन तालुका कृषि अधिकारी धर्माबाद यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment