Wednesday, June 17, 2020


वृत्त क्र. 555   
अर्जदारांनी अटींची मर्यादा    
प्रादेशिक परिवहन कार्यालयात
अनुज्ञप्तीचे कामकाज सुरु
नांदेड, दि. 17 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्तीचे कामकाज सुरु करण्यात आले असून अर्जदारांनी अटींचे पालन करावे. दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे. मास्क हँडग्लोज घालून कार्यालयात प्रवेश करावा. आगाऊ वेळ निर्धारण (अपॉईन्टमेंट) असणाऱ्या अर्जदारांन कार्यालयात प्रवेश दिला जाईल, असे नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी कळविले आहे.
राज्यातील सर्व परिवहन कार्यालयातर्गत असणाऱ्या शिबीर कार्यालयातील कामे वगळता उर्वरीत सर्व कामे जसे अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती विषयक सर्व कामे इ. कामकाज सुरु करावीत, असे निर्देश राज्याचे परिवहन आयुक्त यांनी नुकतेच दिले आहे. त्यानुसार या कामांसाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईन्टमेंट) सुरु करण्यात येऊन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामांसाठी कोटा निश्चित करुन देण्यात येणार आहे.
ज्या अर्जदारांनी लॉकडाऊन कालावधीत शिकाऊ, पक्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी वेळ घेतली आहे  त्यांनी आपली अपॉईन्टमेंट रीशेड्यूल करुन घ्यावी. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालया गर्दी कमी ठेवण्याबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील असे, असेही आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...