सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करुन धान्य घ्यावे ;
नांदेड तालुक्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण
अन्न योजनेतून मोफत तांदळाचे वितरण सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 10 :-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती
विचारात घेता, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण
व्यवस्थेतील लाभार्थ्यांना माहे एप्रील, मे व जून 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार अंत्योदयकार्ड धारकांना 23 किलो गहू व 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्य, प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती
3 किलो गहू व 2 किलो तांदुळ आणि ए.पी.एल.
शेतकरी यांना प्रति व्यक्ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो
(सर्व योजनांसाठी गहू 2 रुपये व तांदुळ 3 रुपये किलो) याप्रमाणे वाटप त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे.
माहे
एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्याचे वरील प्रमाणे नियमित अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर त्या-त्या महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना ज्यामध्ये प्राधान्य कुटुंब
योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य प्रतिमाह 5 किलो तांदुळ (मोफत) त्याचबरोबर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रति सदस्य 5
किलो
प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्यात येणार आहे.
या दोन्ही प्रकारचे वाटप पॉस PoS मशीनमार्फत होणार आहे. माहे एप्रिलचे धान्य
वाटप झाले असुन माहे मे 2020 चे धान्य वाटप चालू आहे.
तसेच ज्या लाभार्थ्यांकडे राशनकार्ड आहेत आणि त्यांचे उत्पन्न 1
लाखापेक्षा कमी आहे परंतू त्यांचे ऑनलाईन नोंदणी झालेली नाही अशा कार्डधारकांसाठी 8 रुपये किलो प्रमाणे गहू व
12 रुपये किलो प्रमाणे तांदूळ रास्तभाव दुकानात उपलब्ध करुन
देण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना प्रत्येकी 3
किलो गहू 8 रुपये दराने व 2
किलो तांदूळ 12 रुपये दराने मिळणार आहे.
ऑनलाईन नसलेल्या या लाभार्थ्यांनी धान्य उचलल्यानंतर त्याची
नोंद ई-झी फॉर्म अॅपमध्ये त्यांची नोंदणी होणार आहे.
अंत्योदय योजनेचे लाभार्थी असलेल्या
नागरीकांना प्रति कार्ड 1 किलो साखर मिळणार आहे तसेच अन्न नागरी
पुरवठा व ग्रामीण विकास मंत्रालय यांचे नियतण आदेश पत्र 28 एप्रिल 2020 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लक्ष निर्धारीत सार्वजनीक वितरण व्यवस्थेतील
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति
शिधापत्रीका प्रति महा 1 किलो डाळ या परीमानात (तुरदाळ व चनादाळ या
दोन्हीपैकी एक दाळ 1 किलो या कमाल मर्यादेत) मोफत वितरीत होणार आहे.
नांदेड तालूक्यात अंत्योदय योजनेत 7 हजार 836 शिधात्रीका असुन त्यावरील लोकसंख्या 37 हजार 102 इतकी आहे तर प्राधान्य कुटूंब योजनेत 64 हजार 195 शिधापत्रीका असुन त्यावरील लोकसंख्या 3 लाख 11 हजार 740 इतकी आहे. तसेच शेतकरी योजनेत 5 हजार 174 शिधापत्रीका असुन त्यावरील लोकसंख्या 24 हजार 654 इतकी आहे.
या सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्तधान्य
दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्ससिंगचे पालन
करुन धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment