Tuesday, May 12, 2020


नांदेड जिल्हा प्रशासनाच्या विशेष प्रयत्नाने
अनाथ, निराधार, निराश्रीत बालकांना मिळाली मदत
नांदेड, (जिमाका) दि. 12 :- बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) 2015 अधिनियमांतर्गत नांदेड जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी बालगृह व शिशुगृहात दाखल असलेल्या काळजी व संरक्षणाच्या अनाथ, निराधार, निराश्रीत, परित्यक्त व उन्मार्गी प्रवेशित बालकांना नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या विशेष प्रयत्नाने बालगृहातील बालकांना गहू, तांदूळ, पिठ, दाळ, मिरची पावडर, मिठ पुडा, साबण आदी जीवन आवश्यक साहित्यांचे वाटप केले आहे. तसेच किर्ती गोल्ड मार्फत बालगृहातील मुलांना 165 लिटर खाद्य तेल देण्यात आले. पारले-जी बिस्कीट प्रा. लि. तर्फे एक हजार बिस्कीट पुड्याचे वाटप एम. के. बोव्हरी वितरक नांदेड जिल्हा यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
या खाद्यपदार्थांचे वाटप स्वयंसेवी संस्थाचे अधीक्षक यांना करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाने मिळालेल्या या मदतीसाठी नांदेडच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए. पी. खानापुरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे, जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, तसेच स्वयंसेवी संस्थेच्या अधिक्षकांनी नांदेड जिल्हा प्रशासनाचे या मदतीबाबत आभार मानले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...