आरोग्य
सेतू ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत
दिल्लीचा
एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह
नांदेड
जिल्ह्यात एकुण 52 रुग्ण संख्या
नांदेड,
(जिमाका) दि. 11 :- प्राप्त 115 अहवालानुसार एनआरआय
यात्री निवास कोविड केअर सेंटर नांदेड येथील एक रुग्ण पुरुष (वय 60) रा. दिल्ली हा
आज पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच 113 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून
त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 52 रुग्ण
पॉझिटिव्ह आढळली आहेत.
सर्व नागरिकांनी मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन
घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क
राहण्यास मदत मिळते, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले
आहे.
कोरोना विषाणु संदर्भातील सोमवार 11 मे 2020 रोजी सायं. 5
वा. पर्यंत देण्यात आलेल्या माहितीमध्ये नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी,
प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 98 हजार 690 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यातील
1 हजार 828 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी 1 हजार 702 स्वॅब तपासणीचा
अहवाल हा निगेटिव्ह आला असून 38 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. यात घेतलेल्या 52
रुग्णांच्या स्वॅबचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या पॉझिटिव्ह 52 रुग्णांपैकी 11 रुग्ण
हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड,
व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्णांवर आणि माहूर कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु
असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्ण हे मृत झाले
आहेत.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे या 5 रुग्णांचा मृत्यू
झाला असून मृत्यू पावलेले हे रुग्ण रक्कतदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते.
त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात
कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड
जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ
भोसीकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा : कोरोना
विषाणू संसर्गाची आकडेवारी
• आत्तापर्यंत एकूण संशयित– 1 हजार 816 , • एकूण क्वारंटाईन
व्यक्तींची संख्या- 1 हजार 703, •
क्वारंटाईन कालावधी पूर्ण– 614, • अजून निरीक्षणाखाली असलेले– 108, • पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये– 247, • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले– 1 हजार 456, • एकुण नमुने तपासणी- 1 हजार
828, • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 52, • पैकी निगेटीव्ह – 1 हजार 706, • नमुने तपासणी अहवाल आज बाकी- 38, • नाकारण्यात आलेले नमुने– 6,
• अनिर्णित अहवाल– 25, • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या– 5, • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 98 हजार 690
असून त्यांना त्यांच्या घरी राहण्याचा सल्ला दिला आहे तसेच
त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून
देण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment