Saturday, April 18, 2020


महानगरपालिका क्षेत्रात
नागरिकांची झोननुसार तपासणी ;
रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना
नांदेड दि. 18 :- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात बाहेर गावावरुन येणाऱ्या नागरीकांची दिवसातून 24 तासांमध्ये केंव्हाही जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग येथून येणारे संदेश व सामान्य नागरीकांकडून येणारे संदेश प्राप्त होतात. नागरिकांची थर्मल मशिनने तपासणीसाठी झोननुसार रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांनी दिली आहे.
या टीममध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संबंधित झोनमध्ये आलेल्या नागरीकांची तपासणी करुन अहवाल जंगमवाडी येथे सादर करणार आहेत. यामध्ये झोन क्रमांक, कार्यक्षेत्र, अधिकाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, कर्मचाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. एक- सांगवी, तरोडा बु.:-अधिकारी डॉ.सचिन सिंघल-727699194. आरोग्य कर्मचारी एम. ए. पठान-9960986276. दोन-तरोडा खु :-अधिकारी डॉ. सचिन चांडोळकर-8007925809. आरोग्य कर्मचारी एस. जी. चव्हाण-  9421850709. तीन-जंगमवाडी :-अधिकारी डॉ. भास्कर औराळकर  9527770300. आरोग्य कर्मचारी डी. डी. वळशिंगे -9503229761.  चार-सहयोगनगर :- अधिकारी डॉ. कल्याण पवार-9960994440. आरोग्य कर्मचारी वनराज कदम-9096290358. पाच-शामनगर :- अधिकारी डॉ. रमेश जाधव-9673706043. आरोग्य कर्मचारी संजय हावळे- 9834974314. सहा-दत्तनगर :- अधिकारी डॉ. देवानंद देवसरकर-9892072137. आरोग्य कर्मचारी जी. एस. पाटील-8208021263. सात-खुशालसिंहनगर :- अधिकारी डॉ. गजानन मुंनगीलवार-9423440879, आरोग्य कर्मचारी बी. एम. आळणे-7773973339. आठ-श्रावस्तीनगर :- अधिकारी डॉ. रितेश बिसेन-9850433391. आरोग्य कर्मचारी दिलीप गायकवाड- 8169773528. नऊ-खडकपुरा :- अधिकारी डॉ. शारेख खान-9881126378, आरोग्य कर्मचारी गजानन कंकाळ-9823044171. दहा-वजिराबाद :- अधिकारी डॉ. विनोद चव्हाण-922195847, आरोग्य कर्मचारी एस. एस. पिंपळगावकर-9225907500. अकरा-हैदरबाग :-अधिकारी डॉ. राफे अन्सारी-9552587338, आरोग्य कर्मचारी अब्दल रज्जाक-9860293977. बारा- करबला :- अधिकारी डॉ. रिजवान अहेमद-9552587340, आरोग्य कर्मचारी निसार अहेमद-7972576779. तेरा- इतवारा :- अधिकारी डॉ. अशोक धबाले- 9011027235, आरोग्य कर्मचारी जी. वाय. ताडेवार-7620968098.चौदा-कौठा :-अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुंटूरकर- 9011027193, आरोग्य कर्मचारी डी. एस. इंदुरकर- 9511708634. पंधरा-सिडको :- अधिकारी डॉ. अब्दुल हमीद-7741988742,आरोग्य कर्मचारी सुरेश आरगुलवार-9405142419. यानुसार झोनमधील काही डॉक्टरांची नियुक्ती कोव्हीड 19 उपाययोजनेंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड झोन क्रमांक, झोनचे नाव व झोन अंतर्गत येणारे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे आहे. एक-तरोडा बु सांगवी:- तरोडा शिवरोड ते तरोडा बु गाव व चैतन्य नगर रोड विमानतळ व सांगवी पुर्ण एरिया. दोन-तरोडा खु:- तरोडा शिवरोड ते तरोडा खु गाव व तरोडा नाका ते मनपा हद्द छत्रपती चौक. तीन-जंगमवाडी:- राज कॉर्नर ते छत्रपती चौक डावाभाग ते काबरानगर पाणी शुध्दीकरण केंद्र डावा भाग ते  गणेशनगर वाय पॉइंट ते महात्मा फुले मंगल कार्यालय डावाभाग ते राज कॉर्नर. चार-सहयोग नगर:- राज कॉर्नर ते वर्कशॉप पाण्याची टाकी डावा भाग ते नागाजुर्न हॉटेल डावा भाग ते हनुमान गड विमानतळा पर्यंत. पाच-शामनगर:- वर्कशॉप पाण्याच्याटाकी पासून ते आनंदनगर उजवाभाग  ते महादेव दाळमील ते मस्तानपुरा रोड ते विष्णुनगर रोड उजवा भाग ते रेल्वे पटरी ते शिवाजीनगर दादरापर्यंत ते वर्कशॉप कॉर्नर उजवा भाग. सहा-दत्तनगर:- आनंदनगर रोड डॉ. सोमानी यांच्या दवाखान्यापासून ते महादेव दाळमील पर्यंत ते मस्तानपुरारोड ते हिंगोलीगेट ओव्हर ब्रिजपर्यंत डावाभाग ते दत्तनगर ते बाफना ओव्हरब्रिज ते एलआयसी ऑफिस ते नागार्जुन हॉटेल आनंदनगर रोड उजवा भाग. सात-खुशालसिंहनगर:- विमानतळ नमस्कार चौक ते डॉ. आंबेडकरभवन ते कामठा चौक ते नवीन रेल्वे स्टेशनपर्यंत नमस्कार चौक ते एलआयसी ऑफिस डावा भाग ते बाफना ओव्हर ब्रीज डावाभाग पूर्ण ग्यानमाता शाळेचा मागचा भाग म्हाळजा टेकडी. आठ-श्रावस्तीनगर:- महात्मा पफुले मंगल कार्यालय शिवाजीनगर ओव्हर ब्रिज उजवा भाग ते रेल्वे लाईन धरून श्रावस्तीनगर मनपा हद्द / ते काबरानगर पाणी शुध्दीकरण केंद्र ते महात्मा फुले मंगल कार्यालय उजवा भाग. नऊ-खडकपुरा:- गोवर्धन घाट ते वजिराबाद चौक ते बसस्थानक, ओव्हर ब्रिज व पुर्विचा खडकपुरा झोन. दहा-वजिराबाद:- पुर्वीचा वजिराबाद झोन व वजिराबाद चौक, गोवर्धन घाट डावा भाग ते जुना मोंढा पुल पर्यंत ते भगतसिंग रोड बाफना ओव्हर ब्रिज ते बससॅण्ड पर्यंत. अकरा-हैदरबाग:- बाफना ओव्हर ब्रिज ते जुनापुल नदी पर्यंत संपूर्ण डावा भाग. बारा-करबला:- किल्लापासुन ते मोगडपल्ली ते पहेलवान टी हाउस ते देगलूर नाका ते जुनापुल नदी पर्यंत. तेरा-इतवारा:- चौक ते कापुस संशोधन केंद्ररोड उजवा भाग इतवारा कडील भाग ते देगलूर नाका पर्यंत ते मनीयार गल्ली चौक पर्यंत उजवा भाग. चौदा-कौठा:- जुना कौठा, नविन कौठा, वसरणी ते लातुर फाटा ते अर्सजन उजवा भाग. पंधरा-सिडको:-  लातूर फाटा ते सिडको, हडको ते भिमवाडी वसरणी याप्रमाणे एकुण पंधरा झोनच्या विस्तारांतर्गत आरोग्य विभागाचे कार्यक्षेत्र आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...