नागरिकांच्या मदतीसाठी :
नियंत्रण कक्षाची स्थापन
नांदेड दि. 27 :-संचारबंदी व
लोकडाऊनच्या अनुषंगाने नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक
कार्यालयात एक सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. येथील दूरध्वनी
क्रमांक 02462- 234720 व हेल्पलाइन क्रमांक 1091 व 100 क्रमांकाच्या पाच लाईन सुरु करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी शासनाकडून राज्यभर कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली
आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे पोलिसांसोबत सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या,
तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा व्हावी. यासाठी
नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे व्हाट्सअप मेसेज सेवा सुरु करण्यात आली आहे. ही सेवा
24 तास उपलब्ध असते त्याचा क्रमांक 88888 89255 हा आहे. त्यावर देखील नागरिकांना माहिती दयावी, असे आवाहन नांदेडचे पोलीस
अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment