Monday, March 23, 2020


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे
कामकाज पुढील आदेशापर्यंत स्थगित
नांदेड दि. 23 :- कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज सोमवार 23 मार्च पासून पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आले आहे. सोमवार 23 मार्च 2020 पासून कार्यालयात फक्त वाहन नवीन नोंदणीचे सर्व काम सुरु राहील. याची संबंधीत नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठया प्रमाणात अभ्यागतांचे येणे जाणे असल्यामुळे गर्दी जमा होते. त्यामुळे कोरोना व्हायरस प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...