कोरोना विषाणू नियंत्रणासाठी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे
कामकाजाबाबत आवाहन
नांदेड दि. 18 :- कोरोना विषाणू नियंत्रणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात
येत्या 31 मार्च पर्यंत अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहनांची पुर्ननोंदणी, योग्यता
प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना संबंधी, वाहन नवीन नोंदणीचे
कामे करण्यात येतील. वाहन
हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद आदी कामे करण्यात येणार नाहीत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली
आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. त्याअनुषंगाने प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठया प्रमाणात अभ्यागतांचे येणे-जाणे असल्यामुळे गर्दी जमा होते, त्यामुळे कोरोना व्हायरस प्रसार होण्याची संभावना कमी करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या परिपत्रकान्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कळविले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे 31 मार्च पर्यंत शिकाऊ अनुज्ञप्त्यासाठी
घेतलेल्या अर्जदारांचे अपॉईंमेंट
पुढील महिन्यामध्ये रिशेडयूल
करण्यात येईल. ज्या
अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्ती 31 मार्च पूर्वी
संपणार आहे अशा अर्जदारांची
पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी
घेण्यात येणार आहे. सर्व
पक्की अनुज्ञप्तीचे अपॉईंटमेंट
पुढील महिन्यामध्ये रिशेडयुल
करण्यात येणार आहेत. जिल्हयातील सर्व कॅम्प कार्यालय 31 मार्च 2020
पर्यंत बंद राहतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे
आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड
यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment