Tuesday, February 18, 2020


महावितरणने थकीत देयकांची
गावनिहाय यादी तयार करावी
                                                                --- पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, दि. 18 :-  जिल्ह्यातील ज्या-ज्या गावांकडे वीज देयके थकीत आहेत, त्या गावांची गावनिहाय व वीज देयकनिहाय माहिती तयार करावी, जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावा, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. चव्हाण संपन्न झाली.
यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर दिक्षाताई धबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहने, कार्यकारी अभियंता श्री. गोपूलवार, नांदेड ग्रामीणचे कार्यकारी अभियंता श्री. दासकर, नांदेड शहरीचे कार्यकारी अभियंता श्री.पहूरकर, देगलूरचे कार्यकारी अभियंता श्री. चाटलवार यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी यांनी वीज देयकाच्या थकबाकी तसेच वसुलीबाबत मॉनिटरिंग ठेवण्यात यावे. तसेच ट्रान्सफार्मची स्थिती, ऑईल, स्ट्रीट लाईट, किटकॅट आदि बाबतचीही माहिती देण्यात यावी. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसांनी बैठक घ्यावी तसेच मॉनिटरींगही ठेवण्यात यावे. ट्रान्सफार्मरची दुरुस्ती, शहरी भागातील अंतर्गत वायरिंग ही कामे दर्जेदार करावेत, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...