Tuesday, February 18, 2020


नाल्यांचे पाणी नदीत जाऊ नये यासाठी
उपाययोजना कराव्यात - पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 18 :- नांदेड मधील नाल्यांचे पाणी नदीमध्ये जाऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत             श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर दिक्षाताई धबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता अनिल कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते, सल्लागार प्रतिनिधी महेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.  
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, नागपूर मनपाने केलेला प्रकल्प अहवालाचा अभ्यास मंत्रालयात जाऊन करावा. नांदेड शहराच्या भविष्याचा विचार करुन 77 कोटीच्या प्रकल्पाचा अहवाल पुन:श्च परिपूर्ण तयार करावा. चालु असलेल्या 16.65 कोटीचा एसपीएस, एसटीपीचे काम 15 दिवसासाठी थांबवून सल्लागाराचा अनुभव तपासावे. काम गुणवत्तेमध्ये होईल याची काळजी घ्यावी. नांदेडमध्ये प्रयोग करुन नका. जिल्हाधिकारी यांनी स्वत: विष्णुपुरी जलाशयात मिळत असलेल्या नाल्याच्या पाण्याचे निरीक्षण करावे. पाण्याचे वर्गीकरण करणे, पीएच कमी करण्याचा प्रयत्न करणे याबाबत पुनश्च बैठक घेण्यात येईल, अशी सुचना दिली.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...