Saturday, February 1, 2020


लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार जागृती आवश्‍यक
-            प्रा. डॉ. अशोक सिध्‍देवाड,

नांदेड दि. 1 :- सर्वांनी लोकशाही मुल्‍यांचा अंगिकार केला तरच भारतीय स्‍वातंत्र्यांसाठी लढणाऱ्या स्‍वातंत्र्य सैनिक आणि घटनाकारांना अभिप्रेत समाज निर्माण होईल, असे प्रतिप्रादन स्‍वा.रा.ति.म.विद्यापीठाचे नोडल ऑफिसर प्रा. डॉ. अशोक सिध्‍देवाड यांनी केले. लोकशाही पंधरवाडा निमीत्‍य आयोजित रॅलीच्‍या समारोप प्रसंगी बचत भवन जि.का. नांदेड येथे ते बोलत होते.
26 जानेवारी 2020 ते 10 फेब्रुवारी 2020 दरम्‍यान लोकशाही पंधरवाडा साजरा करण्‍यात येत असुन त्‍या निमित्‍यांने आज दिनांक 01 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका नांदेड व स्‍वा.रा.ति.मराठवाडा विद्यापिठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमानाने लोक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते.
प्रा. डॉ. सिध्‍देवाड म्हणाले, 73 व 74 व्‍या घटना दुरुस्‍तीनंतर भारतीय लोकशाहीतील सत्‍तांतराची प्रक्रिया गतीमान झाली असुन लोकशाहीत महिला व मागास घटकांना प्रतिनिधीत्‍व प्राप्‍त होत असले तरी अद्यापही लोकाशाहीत अनेक विक्षेप कायम असुन ते दुर करणेसाठी मतदार जागृती होणे आवश्‍यक आहे.
या रॅलीस जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन खल्‍लाळ निवासी उपजिल्‍हाधिकारी, श्रीमती संतोषी देवकुळे प्रभारी उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), अरुण ज-हाड तहसिलदार, यांनी हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात केली. महापालीकेचे उपायुक्‍त अजितपालसिंग संधु, सुधिर हिंगोले व गुलाम सादीक तसेच श्री बनसोडे, शिक्षण अधिकारी मनपा, रुस्‍तुम आडे, गटशिक्षण अधिकारी, व्‍यंकटेश चौधरी शिक्षण विस्‍तार अधिकारी, अशोक पावडे स.गटविकास अधिकारी, श्री पुपुलवाड व.स. हे उपस्‍थीत होते.
यावेळी जागरुक नागरिक मी भारताचा हक्‍क बजाविन मतदानाचा, जागरुक मतदार लोकशाहीचा आधार, 100 टक्‍के मतदान हिच लोकशाहीची शान अशा घोषणा विद्यार्थी व उपस्थितांनी दिल्‍या. स्‍वा.रा.ती.म. विद्यापीठातर्फे डॉ. शिवराज बोकडे, प्रा.हरीचंद्र पतंगे, प्रा. बाबासाहेब भुक्‍तरे, डॉ. भागवत पस्‍तापुरे, ए.एन.गिरी मुख्‍याध्‍यापक, मो. अथरोद्दीन क्रिडा शिक्षक, जिल्‍हाधिकारी कार्यालयातर्फे श्रीमती मृणाल जाधव तहसिलदार, सारंग चव्‍हाण, ना.त., श्रीमती संजिवणी मुपडे ना.त., श्रीमती प्रिया जांभळे पाटील नात., श्रीमती उर्मिला कुलकर्णी ना.त., तसेच सामान्‍य शाखेतील माधव पवार, नागेश स्‍वामी उपस्थित होते.
रॅलीस इ.एन. गच्‍चे झोनल अधिकारी, चव्‍हाण अधिक्षक, श्री इनामदार, व्‍यंकट गंधपवाड, निरंजन भारती, वसंत दिग्रसकर होते. रॅलीत पिपल्‍स हायस्‍कुल, नोबल प्रा.शा., महानगरपालिकेच्‍या शाळा, यशवंत कॉलेज, वसंतराव काळे महाविदयालय, फैजुल उलुम हायस्‍कुल इत्‍यादी शाळा कॉलेजच्‍या 250 विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला.
रॅली महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. येथुन निघुन शिवाजीनगर मार्ग जिल्‍हाधिकारी कार्यालयात आली बचत भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीचे नियोजनात महानगरपालिकेचे ए.एच.इनामदार, व.लि., शेख युनूस, जि.का.चे श्री बंगरवार, अ.का. अनिल धापसे, रविकांत दहिवाल यांनी काम केली.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...