Monday, January 13, 2020


रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन संपन्न
वाहन चालवितांना मोबाईलचा अतिवापर वापर टाळावा
-         उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के
नांदेड, दि. 13 :- वाहन चालवितांना होणारा मोबाईलचा अतिवापर आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसून प्रवास करणे हे गंभीर असून असे प्रकार टाळण्यासाठी जनतेने स्वत:हून प्रयत्न करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांनी केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के बोलत होते.
            यावेळी पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, प्रादेशिपरिवहन अधिकारी शैलेष कामत, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त सुधीर इंगोले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव हे उपस्थित होते.
केंद्र शासनाने 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्यादृष्टीने केंद्र शासनाने या रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी श्री. फास्के यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत करण्याचे आवाहन करुन त्यांना तात्काळ मदत मिळाल्यास जिवितहानी टाळता येईल. अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणा-या व्यक्तीची कोणतीही चौकशी किंवा प्रश्नाची उत्तरे दयावी लागणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
  प्रास्ताविकाप्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेष कामत यांनी सप्ताहामध्ये होणा-या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी मागिल काही वर्षातील भारत, महाराष्ट्रासह नांदेड जिल्हयातील अपघाताची माहिती दिली. एका अपघातूत्यांचे कुटंब उध्दवस्त होते. त्यामुळे होणा-या परिणामाची माहिती दिली. मा. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीबाबत माहिती दिली. या समितीने प्रत्येक जिल्हयात 10 टक्के अपघात कमी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासाठी सर्व विभागांनी, जनतेनी सहकार्य केले तर नांदेड जिल्हयातही अपघात कमी करता येतील असे सांगून श्री. कामत यांनी रस्ता सुरक्षा अभियाना मागचा उद्देश विभागाची भूमिका विशद केली.
मोटार वाहन निरिक्षक मेघल अनासने यांनी अपघात बदल माहिती जनजागृती केली. अपघातामुळे देशाचे फार मोठया स्वरुपात वित्तहानी होत असून यामुळे आपल्या देशाच्या जिडीपीमध्ये 3 टक्के घटल होत असल्याचे सांगितले. वाहतकीपैकी 90 टक्के वाहतूक ही रस्त्यांने होत असते. उर्वरित 10 टक्केमध्ये हवाईमार्गे रेल्वे मार्गाने होत असते. या 10 टक्के वाहतूकीमधील वाहनचालकांना त्यांना मिळणाऱ्या निर्देशानुसार काम री असतात. जी 90 टक्के वाहतूक रस्त्यावरुन होत असते त्यांना कोणतीही निर्देश प्राप्त होत नसून ती स्वत: निर्णय घेऊन वाहतूक करित असतात. त्यामुळे या 90 टक्के वाहतूक करणा-या वाहन चालकांनी वाहन चालवित असताना रस्त्याच्या नियमाचे पालन करुन त्यांचे लक्ष विचलीत होता वाहतूक केली तर अपघातमध्ये फार मोठया प्रमाणात कमी करता येतील, असे सांगितले.
या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या वेळी रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा माहिती पुस्तीका रस्ता सुरक्षा माहितीचे ब्रोशरचे विमोचन उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहामध्ये जनजागृती म्हणून विविध ठिकाणी होणारे पथनाटयचा कार्यक्रम यावेळी करण्यात आला. या पथनाटयाचे जिल्हयात विविध ठिकाणी वर्दळीच्यावेळी पथनाटयमार्फत रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी माहिती दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने एक चित्ररथ तयार करण्यात आला असून उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर चित्ररथास प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. कामत उपस्थित अधिकारी यांनी हिरवा झेंडी दाखवली. या चित्ररथामार्फत जिल्हाभर विविध ठिकाणी साऊंड सिस्टीम बॅनरद्वारे जनजागृती करणात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. कामत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सुरुवात अध्यक्ष उपस्थित अधिकारी यांचे हस्ते दिपप्रज्वलाने करण्यात आल. शेवटी आभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शिवराज पवळे अर्धापूरचे महामार्ग पोलीस गजानन कदम यांनी केले.
याप्रसंगी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यरत अधिकारी कर्मचारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण मोहन कलंबरकर, श्री. पुंडगे प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. विविध संघटनांचे पदाधिकारी, ऑटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी, वाहन चालक, मालक, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक नागरिक उपस्थित होते.
        00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...