Friday, December 6, 2019

दिव्यांग व्युक्तींना मोफत उपकरणे
देण्यासाठी शिबीराचे मंगळवारी आयोजन
नांदेड दि. 6 :- नांदेड तालुक्यात आर्थिक दृष्टया दुर्बल दिव्यांग व वयोश्री योजनेतील जेष्ठ व्यक्तींना मोफत आवश्यक सहायक उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन मंगळवारी 10 डिसेंबर 2019 रोजी श्री विद्याविकास पब्लिक स्कुल टिळकनगर कॉर्नर भाग्यनगर नांदेड येथे करण्यात आले आहे.
 लाभार्थ्यांनी आधार कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राशनकार्ड, जन्म तारखेचा पुरावा आदी प्रमाणपत्रे घेवून यावे, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी केले आहे.  
याबाबत नांदेड तहसिल कार्यालय येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीस उपआयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका नांदेड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड, गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदेड, बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड, समाज कल्याण अधिकारी जि.प.नांदेड, तालुका आरोग्य अधिकारी नांदेड यांचे प्रतिनिधी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड हे उपस्थित होते. या शिबीराच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना बाबत उपविभागीय अधिकारी नांदेड व तहसीलदार नांदेड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिबीरास आर्थिक दृष्टया दुर्बल दिव्यांग व वयोश्री योजनेतील जेष्ठ व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 9 वा. श्री विद्याविकास पब्लिक स्कुकल टिळकनगर कॉर्नर भाग्यनगर नांदेड येथे उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा. ओळखीचे, परिसरातील दिव्यांग व वयोश्री व्यक्तींना या शिबीराबाबत माहिती करुन दयावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...