Friday, December 6, 2019


मतदानाच्या दिवशी घुंगराळा येथे
रविवारी भरणारा आठवडी बाजार बंद  
नांदेड दि. 6 :- नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे रविवार 8 डिसेंबर 2019 रोजी मतदानाच्या दिवशी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) नुसार अधिकाराचा वापर करुन निर्गमीत केला आहे. या ठिकाणचा आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी सोमार 9 डिसेंबर 2019 रोजी भरविण्यात यावा, असे आदेशात नमूद केले आहे.
नांदेड जिल्ह्यात थेट निवडणूकीद्वारे भरण्यात यावयाच्या एकुण 11 रिक्त सरपंच पदासाठी तसेच एकुण 203 ग्रामपंचायतीच्या रिक्त 322 सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी रविवार 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान होणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...