देगलूर,
नायगाव येथील कृत्रिम अवयव
मोजमाप
शिबिरातील तारखेत बदल
नांदेड दि. 12 :- जेष्ठ नागरिक व दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व कृत्रिम अवयव वितरणासाठी आयोजित देगलूर
व नायगाव येथील मोजमाप शिबिरातील तारखेत बदल करण्यात आला असून देगलूर 21
डिसेंबर तर नायगावला 23 डिसेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याची
संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार देगलूर व नायगाव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील
सर्वच तालुक्यातील 10 ते 26 डिसेंबर कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देगलूर
येथे 23 ऐवजी 21 डिसेंबर व नायगाव 21 ऐवजी 23 डिसेंबर रोजी शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे. इतर तालुक्यातील शिबिर ठरलेल्या दिनांकाला होणार आहेत. यासाठी
लाभार्थ्यांना आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा बिपीएल कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात तालुकास्तरावर, नांदेड येथे 10 डिसेंबर,
अर्धापूर- 11, मुदखेड- 12 रोजी संपन्न झाले तर
भोकर- 13, हदगाव- 14, किनवट- 15 व 16,
माहूर- 17, हिमायतनगर- 18, लोहा- 19, कंधार- 20, देगलूर-
21, मुखेड- 22, नायगाव- 23,
बिलोली- 24 धर्माबाद- 25 तर उमरी येथे 26 डिसेंबर रोजी मोजमाप
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन,
जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेडच्यावतीने आयोजित
शिबिरात अस्थिव्यंगांसाठी 3 चाकी सायकल, कुबडी, रोलेटर, व्हीलचेअर, सर्व
प्रकारच्या काठ्या, सीपीचेअर देण्यात येणार आहे तर मोटराइज
ट्रायसायकलसाठी 80 टक्के दिव्यांगत्व
असलेले प्रमाणपत्र व 12 हजार रुपये
स्थानिक सहभाग गरजेचा आहे. अंधप्रवर्गासाठी 75 टक्क्यावरील दिव्यांगत्व प्रमाणपत्र
असणाऱ्याना स्मार्ट केन, ब्रेल कीट, डेसी
प्लेअर, स्मार्ट फोन. मतिमंद प्रवर्गासाठी व्हीलचेअर,
एम आर कीट, सी. पी. चेअर तर कर्णबधीर
प्रवर्गासाठी श्रवणयंत्राचे वितरण करण्यात येणार आहे.
पूर्व नोंदणीसाठी
त्या-त्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जेष्ठ नागरिकांनी व दिव्यांगांनी दिव्यंगत्व प्रमाणपत्र, चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र,
आधार कार्डच्या झेरॉक्स व दोन फोटोसह संपर्क साधावा. असे आवाहन
करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment