जिल्हा नियोजन कार्यालयाचे कामकाज
“आयपास” संगणकीय प्रणालीद्वारे
होणार
13 व 16 डिसेंबरला दुसरी कार्यशाळा
नांदेड, दि. 12 :- जिल्हा
वार्षिक योजना (सर्वसाधारण), खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसेच डोंगरी
विकास कार्यक्रम योजनांचे प्रभावी संनियंत्रण करण्यासाठी “आयपास” संगणकीय प्रणाली विकसित
करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे 1 एप्रिलपासून कामकाज होणार असून याचे पहिली
कार्यशाळा जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात आज संपन्न झाले. या प्रणालीबाबत दुसरी
कार्यशाळा शुक्रवार 13 डिसेंबर व सोमवार 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे
उपआयुक्त (नियोजन) रविंद्र जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, जिल्हा
नियोजन अधिकारी (मानव विकास) सुरेश थोरात, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी.
सुपेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उपआयुक्त (नियोजन) श्री. जगताप म्हणाले, “आयपास” प्रणालीचा परिपूर्ण
माहिती घेऊन प्रत्येक स्टेपचा स्वत: वापर केल्यास प्रणालीद्वारे काम करणे सुलभ होईल.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. कोलगणे यांनी येत्या 1 एप्रिलपासून राज्यात ही
प्रणाली लागू होणार आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा नियोजन समितीचे कामकाज पेपरलेस व
गतीमान होणार असून प्रशिक्षणात दिलेल्या माहितीच्या आधारे प्रणालीचा वापर करावा,
असे सांगितले.
ईएसडीएस सॉफ्टवेअरचे संदेश उगाळे यांनी
प्रणालीतील विविध विषयासह मोबाईलद्वारे भरण्यात येणारी माहिती सादरीकरणाद्वारे देऊन
विचारलेल्या शंकांचे समाधानही केले. शेवटी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.
सुपेकर यांनी आभार मानले.
या प्रणालीच्या दुसरी कार्यशाळा शुक्रवार 13
डिसेंबर व सोमवार 16 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा
नियोजन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment