विधी सहाय्य मिळविण्यासाठी जनजागृती ;
पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 21 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई
यांच्या निर्देशांनुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण दिपक धोळकिया,
यांच्या मार्गदर्शनाखाली अटकपूर्व, अटक आणि रिमांड स्तरावरील
न्याय सर्वांसाठी या संकल्पनेतून जनजागृतीबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज 21 नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले होते.
या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक
धोळकिया यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माननीय सर्वोच्य न्यायालयाचे व उच्च
न्यायालय यांचे वेगवेगळया न्याय निर्णयामधील निर्देशनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश
सर्व पोलीसांना दिले.
पोलीसांनी त्यांचे कर्तव्य बजावत असताना आरोपीच्या हक्काची
पायमल्ली होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच आरोपीचा पूर्व इतिहास, गुन्हेगारी पार्श्वभूमी या सर्व बाबी विचारात
घ्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेस जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. हिवाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस.
रोटे, सहाय्यक सरकारी वकिल श्रीमती सुनंदा चावरे, हाके सर, सरकारी वकिल, नांदेड
जिल्हयातील पोलीस अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलीसांनी अटक पूर्व,
अटक व रिमांड करताना या व्यक्तीस त्याच्या न्याय्य अधिकाराची त्यास
जाणीव करुन देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस.
रोटे यांनी केले. तसेच नय्युमखान पठाण,
रिटेनर लॉयर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर एस. एम बेंडे,
रिटेनर लॉयर यांनी मान्यवरांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केल्या बद्दल
व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment