जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी
728 लक्ष रुपयाचा प्रस्ताव
वैधानिक विकास मंडळाकडे सादर केला
नांदेड,दि. 29 :- जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम क्षेत्रांतर्गत असलेल्या 31 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका तसेच
माविम अंतर्गत असलेल्या महिला बचत गटांसाठी
स्वयंरोगार यंत्र सामुग्रीसाठी 728 लक्ष रुपयाचा प्रस्ताव वैधानिक विकास महामंडळाकडे सादर केला. प्रस्ताव योग्य असल्याचे व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कराड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम क्षेत्रअंतर्गत असलेल्या एकूण
31 प्राथमिक आरोग्य
केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत रुपये 410 लक्ष
निधीचा प्रस्ताव तसेच माविम अंतर्गत असलेल्या महिला बचत गटांसाठी
बैल चलित बहुउद्देशीय शेती यंत्र शेतकरी स्वयंरोजगार किट यासाठी रुपये 159 लक्ष निधीचा प्रस्ताव, टेलरिंग युनिट गारमेंट सेंटर साठी रुपये 75 लक्षचा प्रस्ताव
हिमायतनगर येथील महिला बचत गटांसाठी खवा तयार करण्यासाठी ची यंत्र रुपये 6.15 लक्ष्यचा प्रस्ताव
मैदान कल्लूर ता देगलूर येथील पुदिना शेतीसाठी कूलिंग शीत वाहन व इतर अनुषंगिक साहित्य साठी रुपये 13.50 लक्षाचा प्रस्ताव
धर्माबाद तालुक्यातील महिला बचत गटांसाठी मसाला गृह उद्योगसाठी रुपये 14.22 लक्ष्याचा प्रस्ताव वैधानिक विकास महामंडळाकडे सादर केला.

या बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकऱ्यांनी उत्पादन
केलेल्या सोयाबीनसाठी ग्रेडिंग मशीनचा 110 लक्ष्य रुपयाच्या प्रस्तावास निधी उपलब्ध करून देण्याची
विनंती केली.
नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण
उपक्रमाची दखल शासनाने घ्यावी, असे सांगून डॉ. कराड यांनी जिल्ह्यात राबविण्यात
येणाऱ्या कर्करोग निदान विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेऊन या उपक्रमाचा अहवाल
शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गर्भवती
मातांसाठी अंगणवाडी येथे सामूहिक दुपारचे जेवण व जेवण झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या
लोहयुक्त औषधे गोळ्याचे सेवन याबाबत सविस्तर माहिती दिली. या उपक्रमाची विशेष दखल
डॉ. कराड यांनी घेतली. या कामांबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्य कार्यकारी
अधिकारी यांची प्रशंसा डॉ कराड यांनी केली.
बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी श्री थोरात, श्री सुपेकर, जिल्हा
उपनिबंधक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा
शल्य चिकित्सक, जिल्हा कृषी अधीक्षक, उपायुक्त
पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा समन्वय
अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment