राजा राममोहन
रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी
7 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 19 :- राजा
राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानांच्या योजनांबाबत इच्छूकांनी अधिक माहितीस्त्व
आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयाशी संपर्क
साधावा तसेच अधिक माहितीसाठी
प्रतिष्ठानांचे www.rrrlf.gov.in
हे संकेतस्थळ पहावे. या योजनेचा
लाभ घेण्यासाठी सादर करण्यात
येणारे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने आवश्यक
त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करुन इंग्रजी, हिंदी भाषेत भरावेत, असे आवाहन ग्रंथालय
संचालनालयाचे ग्रंथालय संचालक सुभाष
राठोड यांनी राज्यातील सर्व
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले
आहे.
भारत सरकारच्या
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत
राजा राममोहन रॉय ग्रंथालय
प्रतिष्ठान कोलकत्ता यांच्या असमान निधी
योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक
ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात.
सन 2019-20 पासून असमान निधी योजनांसाठीचे
विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in
या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत
प्रतिष्ठानकडून निर्देश देण्यात आले आहेत.
असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा याबाबत
www.rrrlf.gov.in
या संकेतस्थळावरील असमान
निधी योजना या खिडकीखाली
देण्यात आलेल्या User guide for applying online
assistance यावर सविस्त्र माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या अर्जाची प्रिंट काढून अपलोड केलेल्या आवश्यक
कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतीत संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 11 डिसेंबर 2019
रोजी सायं. 5 वाजेपर्यंत सादर करावेत.
त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
असमान निधी
योजना सन 2019-20
साठी ग्रंथालय
सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना
ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत
विस्तार यासाठी असमान निधीतून
अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय
प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत
करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी
वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125, 150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य.
राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता
कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य.
बाल ग्रंथालय व राजा
राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा
स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते, अशी
माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment