Saturday, November 30, 2019


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 7 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे
यांच्या उपस्थितीत बाल कल्याण समितीची बैठक संपन्न
नांदेड दि. 30 :- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बाल न्याय मंडळ बाल कल्याण समिती, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, अधिक्षक मुलांचे निरीक्षण गृह नांदेड यांच्या सोबत गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी बैठक संपन्न झाली.
बैठकीबाल न्याय मंडळाचे अध्यक्षा श्रीमती गवई, डॉ. हरदीपसिंग, डॉ.समता तुमवाड (सदस्य बाल न्याय मंडळ) तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती आर.पी.काळम, ॲड. गणेश जोशी, ॲड. सावित्री जोशी, डॉ. लटुरिया (सदस्य, बाल कल्याण समिती ) श्री. खानापुरकर जिपअ, श्री. दवणे अधिक्षक, निरीक्षण गृह नांदेड, श्रीमती राठोड हे उपस्थित होते.
बालकांसंबंधी विविध विषयावर चर्चा करुन अध्यक्ष श्री. घुगे म्हणाले, जे अनाथ बालके आहेत त्यांच्यासाठी Sponsorship शोधणे, पालकत्व मिळवून देणे, बालकांना दत्तक घेण्यास इच्छुक पालक शोधणे, ज्या मुलास कुटूंबच माहिती नाही अशा बालकांना सुट्यात कौटुंबिक वातावरण निर्माण करुन देण्यासाठी इच्छुक कुटूंब मिळवून देणे आदी बाबीवर मोलाचे मार्गदर्शन केले. बाल कल्याण समिती बाल न्याय मंडळ यांच्या कामकाजाशी संबंधीत काही अडचणी असल्यास सोडवण्याचा निश्चीतपणे प्रयत्न करु असे ही ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मुलांचे निरीक्षणगृह नांदेड येथील प्रवेशितांशी संवाद साधला स्वत: बालक होऊन त्यांच्याशी मनसोक्त गप्पा केल्या आणि निरीक्षण गृहातील सोयी-सुविधाबाबत समाधान व्यक्त केले.
शेवटी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी आभार मानले.
00000


विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड, दि. 30 :- शैक्षणिक वर्षे 2015-16 ते 2017-18 या कालावधीतील विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गाच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांनी नमुद केल्याप्रमाणे बँक खात्याच्या चुकीच्या विवरणामुळे अद्याप शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्यास त्यांनी 31 डिसेंबर 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करुन अचूक वैयक्तिक बँक खात्याच्या पासबुकाची छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपुती (फ्रीशिप) व्यावसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता (विद्यावेतन) योजनेतर्गत कनिष्ठ / वरिष्ठ अनुदानित विनाअनुदानित तसेच व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्षे 2015-16, 2016-17 2017-18 मध्ये प्रवेशित विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना लाभ देण्यासाठी महाईस्कॉल प्रणाली कार्यान्वित होती.  या महाईस्कॉल प्रणाली अंतर्गत www.mahaeschol.maharashtra.gov.in संकेतस्थळावरुन उपरोक्त योजनेेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना निर्वा हभत्याची रक्कम थेट बँक खात्यात शैक्षणिक शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयाच्या थेट बँक खात्यात ईसीएसद्वारे जमा करण्यात येत होती.
            शैक्षणिक वर्षे 2015-16 ते 2017-18 मध विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्जामध्ये चुकीचे बँक खाते क्रमांक, चुकीचे आयएफएससी कोड भरलेले असल्यास अशा विद्यार्थ्यांची निर्वाहभत्याची रक्कम अद्याप या कार्यालयाच्या बँक खात्यावर अखर्चित (शिल्लक) आहे. तसेच ज्या महाविद्यालयाचे महाईस्कॉल प्रणालीमध्ये वरील कालावधीतील चुकीचे बँक खाते क्रमांक, चुकीचे आयएफएससी कोड नोंदविलेले असल्यास अशा महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम अद्याप अखर्चित (शिल्लक) आहे.
            या योजनेअंतर्गत एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून वाटपासाठी शिल्लक निधी अखर्चित (शिल्लक) राहिल्यास हा अखर्चित निधी शासनखाती जमा करण्याबाबत वरिष्ठांकडून सुचना देण्यात आलेल्या आहेत.  जे विद्यार्थी महाविद्यालये 31 डिसेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज अचूक वैयक्तिक बँक पासबुकाची छायांकित प्रत सादर करणार नाहीत असे विद्यार्थी महाविद्यालयाच्यावरील कालावधीतील प्रलंबित अखर्चित (शिल्लक) शिष्यवृत्तीची रक्कम कायमस्वरुपी शासनखाती भरणा करण्यात येणार आहे.
            त्याकरीता शैक्षणिक वर्षे 2015-16 ते 2017-18 या कालावधीतील विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी चुकीच्या बँक खाते विवरणामुळे शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार ना ही संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000


रस्ता सुरक्षा प्रबोधनात्मक
महा-वॉकेथॉन रॅली संपन्न
नांदेड, दि. 30 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्यामार्फत "रस्ता सुरक्षा महा वॉकेथॉन" रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
ही रॅली ही माता गुजरीजी विसावा उद्यान येथून सुरु होऊन कुसूम सभागृह आयटीआय कॉर्नर ते शिवाजीनगर पोलीस ठाणे-जलतरण तलाव आणि परत विसावा उद्यान या मार्गावर घेण्यात आली. या रॅली शासकीय औद्योगिक संस्था, यशवंत महाविद्यालय, केंब्रीज विद्यालय, एनसीसी कॅडेट असे जवळपास पाचशे विद्यार्थी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, ड्रायव्हींग स्कूल, वाहन वितरक प्रतिनिधी, वाहन मालक-चालक यांचे प्रतिनिधी जवळपास सातशे जणांनी या रॅली सहभाग घेतला.
या रॅली विद्यार्थ्यांनी विविध रस्ता सुरक्षात्मक स्लोगनच्या घोषणा देऊन पादचाऱ्यांचे तसेच तर नागरिक, चालक यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात टाळण्यासाठी लोकांमध्ये संदेश पसरविण्यास मदत झाली.
यासाठी महानगरपालिकेने विसावा उद्यान रॅलीसाठी उपलब्ध करुन दिले. या रॅली जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या सोबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर अनंता जोशी आणि कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कार्यालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या रॅलीमध्ये स्कुल बस असोसिएशन नांदेडचे अध्यक्ष निखिल लातूरकर, शासकीय औद्योगिक संस्थेचे डी. पुंडगे, मोहन कलंबरकर, पी. बानाटे तसेच केंब्रीज विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि इतर महाविद्यालयाचे शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या आरंभी शासकीय रुग्णालय नांदेड येथील चमूने अपघात दरम्यान व्यक्तींना कसे हाताळावे याचे जीवंत प्रात्यक्षिक डॉ. शिंदे आणि श्री. सचिन यांनी उपस्थितांना दिले त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या रॅली दरम्यान शहर वाहतूक शाखा नांदेड यांनी वाहतूकीचे योग्य नियोजन करुन रॅली योग्यरित्या संपन्न झाली.
000000

x

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...